मराठवाडा

जलशुद्धीकरण प्रकल्पाची पोकलेन घालून मोडतोड

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - शहरातून वाहणारी मुख्य नदी असलेल्या खामचे पाणी स्वच्छ करण्यासाठी उद्योगांनी उभारलेल्या प्रकल्पाची मोडतोड करण्यात आली. पाइपलाइन दुरुस्तीसाठी पोकलेन थेट नदीपात्रात घातल्याने जलशुद्धीकरण यंत्रणेवर आघात झाला आहे.

खाम नदीच्या पाण्याची शुद्धी करून जायकवाडीकडे सोडण्यासाठी छावणी परिसरातील पात्रात व्हेरॉक आणि अन्य उद्योगांनी सुमारे सव्वा कोटी रुपये खर्चून पाणी शुद्धीकरण प्रकल्पाची उभारणी केली आहे. हा प्रकल्प दोन वर्षांपासून अनेक अडचणींना सामोरा जात असून, गुरुवारी या प्रकल्पावर नव्याने आघात झाला. जलवाहिनीच्या कामासाठी आलेले पोकलेन थेट नदीपात्रात घालण्यात आले. यामुळे नदीच्या प्रवाहावर प्रक्रिया करण्यासाठी लावण्यात आलेला दगडी पूल आणि पात्रालगत लावलेल्या झाडांची नासधूस झाली आहे. यापूर्वी तीनदा हे काम असेच अडचणीत सापडलेले आहे.

'सरकारी यंत्रणांची कोणतीही मदत या प्रकल्पाला होत नाही. खाम नदीवरील या प्रकल्पाने किमान दुर्गंधी थांबली आहे. यापुढे पाणी शुद्ध करण्यासाठी काम करायचे आहे; पण असेच सुरू राहिले तर उद्योगांनी यासाठी पैसे का द्यावेत?''
- प्रशांत देशपांडे, उद्योजक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : सरकारने लोकांची गैरसोय करुन आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला- आशुतोष रांका

Solapur Temperature: ‘चित्रा’च्या पहिल्याच दिवशी पारा ३८ अंशांवर, नक्षत्र बदलले मात्र परिस्थिती बदलेना; रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या, ६१ वर्षांचा विक्रम मोडणार?

Yuvraj Singh on Dhoni: ‘तो माझा जवळचा मित्र नव्हता…’ युवराज सिंगने सांगितली माहीसोबतच्या नात्याची Inside Story;माहीने करिअरच्या शेवटी...

सुरुची अडारकर-पियुष रानडे यांच्या घरी लक्ष्मीचं आगमन! सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाले, 'आमच्या टीममध्ये आता नवा मेंबर’

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वर कारखाना निवडणूक: पहिल्या दोन तासांत साडेबारा टक्के मतदान, सुनेत्रा पवारांचा विश्वास

SCROLL FOR NEXT