pani namune.jpeg 
मराठवाडा

 ४४ ठिकाणांचे पाणी नमुने दूषित

मंगेश शेवाळकर

हिंगोली : जिल्‍ह्यात पाणी नमुन्यांच्‍या अनुजैविक तपासणीमध्ये ४४ ठिकाणांचे पाणी नमुने दूषित आढळून आले आहेत. त्‍यामुळे या पाणीस्‍त्रोताच्‍या बाजूला ‘पाणी पिण्यास अयोग्‍य’ असे फलक लावण्याच्‍या सूचना जिल्‍हा परिषद प्रशासनाने ग्रामपंचायतींना दिल्‍या आहेत.

जिल्‍ह्यात पाच हजार १८५ पाणीस्‍त्रोत आहेत. यामध्ये हातपंप, विहिरी, सार्वजनिक नळ योजना आदींचा समावेश आहे. यात हिंगोली तालुक्‍यात ९३० पाणीस्‍त्रोत असून औंढा तालुक्‍यात ९०८, वसमत तालुक्‍यात एक हजार ३६, कळमनुरी तालुक्‍यात एक हजार ३९८; तर सेनगाव तालुक्‍यातील ९१३ पाणीस्‍त्रोतांचा समावेश आहे.
या पाणीस्‍त्रोतांची अनुजैविक व रासायनिक तपासणी करून त्‍याचा अहवाल जिल्‍हा परिषदेकडे सादर केला जातो. रासायनिक तपासणीसाठी २१८ पाणी नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्‍यापैकी पन्नास पाणी नमुने दूषित आढळून आले आहेत. यामध्ये हिंगोली तालुक्‍यातील एक, वसमत तालुक्‍यातील ३४, कळमनुरी तालुक्‍यातील १२ पाणी नमुन्यांचा समावेश आहे.

याशिवाय ३४० पाणी नमुन्यांची अनुजैविक तपासणी करण्यात आली आहे. त्‍यापैकी ४४ पाणी नमुने दूषित आढळून आले आहेत. यामध्ये हिंगोली तालुक्‍यातील सात पैकी दोन, वसमत तालुक्‍यातील ९२ पैकी दोन, कळमनुरी तालुक्‍यात सर्वात जास्‍त ८३ पैकी २५ पाणी नमुने दूषित आढळून आले आहेत.
या बाबत भूजल सर्वेक्षण विभागाच्‍या प्रयोगशाळेने जिल्‍हा परिषदेकडे दूषित पाणी नमुन्यांची माहिती सादर केली आहे. त्‍यानंतर जिल्‍हा परिषद प्रशासनाने संबंधित ग्रामपंचायतींना दूषित पाणी नमुन्यांची माहिती दिली आहे. रासायनिक तपासणीमध्ये फ्लोराईडयुक्‍त आढळून आलेल्‍या पाणी नमुन्यांच्‍या परिसरात ‘या पाणीस्‍त्रोताचे पाणी पिण्यास अयोग्‍य’ असे नमूद करून त्‍या ठिकाणी फलक उभारावेत, अशा सूचना देण्यात आल्‍या आहेत. याशिवाय अनुजैविक तपासणीमध्ये दूषित आढळून आलेल्या पाणीस्‍त्रोतांचे शुद्धीकरण करून त्‍या ठिकाणचे पाणी नमुने पुन्‍हा एकदा प्रयोगशाळेत पाठविण्याच्‍या सूचना जिल्‍हा परिषदेने ग्रामपंचायतींना दिल्‍या आहेत.

जलजन्य आजारांच्‍या साथीचा धोका
जिल्‍ह्यात मागील काही दिवसांत दूषित पाणी नमुने आढळून येण्याची संख्या वाढली आहे. त्‍यामुळे या गावांमधून जलजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. त्‍यासाठी ग्रामपंचायतींनी नियमितपणे पाणी शुद्धीकरण करून घेणे आवश्यक आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आज अचानक उतरले सोन्याचे दर! किती हजारांनी स्वस्त झालं, पाहा एका क्लिकवर

India vs Pakistan Asia Cup : 'ऑपरेशन सिंदूर'वरून भारताला डिवचणाऱ्या पाकिस्तानच्या खेळाडूंनी किती धावा केल्या? पाहा स्कोअर कार्ड..

BJP Protest : मोदींच्या आईचा AI व्हिडिओ; भाजप महिला आघाडीचे काँग्रेसविरोधात आंदोलन

Latest Marathi News Updates : मुंबईतील ड्रंक एंड ड्राईव्ह प्रकरणातील जखमीचा मृत्यू, आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ

Ahilyanagar Rain Update: 'नेवासे तालुक्‍यात धो-धो पाऊस; शेतकऱ्यांचे नुकसान', कांदा उत्पादकांची धावपळ

SCROLL FOR NEXT