Water Tanker sakal
मराठवाडा

Phulambri Water Shortage : फुलंब्री तालुका टँकरच्या विळख्यात..! 52 गावात 69 टँकर

फुलंब्री तालुक्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने पाणीबाणी वाढली असून 52 गावात 69 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.

नवनाथ इधाटे

फुलंब्री - फुलंब्री तालुक्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने पाणीबाणी वाढली असून 52 गावात 69 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तर 24 गावात 54 खाजगी विहिर आधिगृहन करण्यात आलेल्या आहे. त्यामुळे फुलंब्री तालुका टँकरच्या विळख्यात सापडला असल्याचे दिसून येत आहे.

फुलंब्री तालुक्यात 93 गावे असून 71 ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावा गावाचा विकास गाडा सुरू आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून सध्या दुष्काळ सदृश्य गावाला पुण्याच्या पाण्याचे टंचाई भासत असल्याने टँकर सुरू करण्यात आले आहे. फुलंब्री तालुक्यात यावर्षी पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे.

या पिण्याच्या पाण्याचा टंचाईवर मात करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रस्ताव पंचायत समिती दाखल केला जात आहे. मागील गेल्या चार महिन्यापासून सातत्याने टँकरच्या मागणीत वाढ होताना दिसत आहे. गावागावात शेत वस्तीवर पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवन भटकावे लागत आहे.

पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने ही कंबर कसली असून टँकरचा प्रस्ताव येतात संबंधित प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाला पाठविला जात आहे. तहसीलदाराने संमती दिल्यानंतर तात्काळ त्या गावात पिण्याचे टँकर सुरू केले जाऊ लागले आहे.

फुलंब्री तालुक्यात आतापर्यंत 52 गावांमध्ये 69 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. तर 24 गावात 54 विहीरी अधीग्रहण करण्यात आलेल्या आहे. अनेक गावांमध्ये टँकरला पाणी भरण्यासाठी विहिरी अधिग्रहण केलेल्या आहे. त्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती मोठी असल्याने प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

टँकर सुरू असलेली गावे

दरेगांव दरी, नायगव्हाण, गिरसावळी, मारसावळी, आळंद (३), रांजणगांव, आडगांव खुर्द, निधोना, वावना, गेवराई पायगा, बोरगांव अर्ज, धनशीवस्ती, आडगांव बु, शेलगांव खुर्द, पाडळी, वाहेगांव, जळगांव मेटे, उमरावती (२), तळेगांव (२), रिधोरा देवी, डोंगरगांव शिव, बाभुळगांव तरटे, सताळपिंप्री, गेवराई गुंगी, जातवा, बाभुळगांव खुर्द, वाघलगांव, कान्हेगांव, शेतवा खुर्द, बाबरा (२), पिपंळगांव गांगदेव, सुलतानवाडी, टाकळी कोलते, पिरबावडा, धानोरा, वडोदबाजार, पाथ्री, पेंडगांव आळंद महाल किन्होळा, शिरोडी खुर्द, वानेगांव खुर्द/बु, रेलगांव, निमखेडा, वारेगांव, नरला भावडी, धामणगांव, पोफळा, सताळ बु, डोगरगांव कवाड खामगांव (२), बिल्डा (२) मालोद्याचीवाडी.

पाण्याच्या प्रश्नावर प्रशासन हायअलर्ट

पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन हायअलर्ट झाले असून टंचाईग्रस्त गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जात आहे. ज्या गावांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध आहे अशा ठिकाणी विहिरी अधिग्रहण केल्या जाऊ लागल्या आहे. तर काही भागात टँकरने नागरिकांची तहान भागवली जात आहे. त्यामुळे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आता प्रशासनही हायअलर्ट झाल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: बॉक्सर्सची गोल्डन कामगिरी! ३० मिनिटांत ३ सुवर्णपदकं... अरुंद्धती चौधरीचे निर्विवाद वर्चस्व; भारताची Medal Tally मध्ये मोठी झेप...

Commonwealth Games 2026 : २२ वर्षीय प्रियाची पहिलीच राष्ट्रकुल स्पर्धा अन् सुवर्णपदक... शेतकऱ्याच्या लेकीने इतिहास घडवला

Deportation Rule: राष्ट्रीयत्वाची खात्री झाल्याशिवाय हकालपट्टी नाही; सर्वोच्च न्यायालयात केंद्राची भूमिका, निर्वासनासाठी ३ अटी अनिवार्य

Commonwealth Games 2026 : साक्षी चौधरीचा गोल्डन पंच; भारतीय सैन्यात असलेल्या पोरीने जग जिंकलं! ज्युदोत उन्नतीची कांस्य क्रांती

IND vs SL : श्रीलंकेचा रडीचा डाव! भारतीय संघाला पुरेसा सराव मिळू नये म्हणून लढवली शक्कल; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT