nagapur nagapur
मराठवाडा

महिलांनी ग्रामसेवकालाच डांबले कार्यालयात; तीन महिन्यांपासून पाणीटंचाई

गावातील नळ योजनेचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रेंगाळले असून त्यामुळे गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे

सकाळ वृत्तसेवा

मांडवी (नांदेड): येथून जवळच असलेल्या नागापूर (ता.किनवट) येथे तीन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक निवेदने देऊनही पाणी पुरवठा सुरू न झाल्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी सोमवारी (ता.३१) ग्रामसेवकास ग्राम पंचायत कार्यालयातच डांबले होते.

गावातील नळ योजनेचे काम गेल्या अनेक दिवसांपासून रेंगाळले असून त्यामुळे गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिला मंडळींना आणि लहानग्यांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. हातावर पोट असणाऱ्या लोकांना मजुरी बुडवून पाणी जमा करावे लागत आहे. मागील काही दिवसांपासून ग्रामसेवक गजानन राऊलवार हे सतत गैर हजर राहत होते. १४ व्या वित्त आयोगाचे पैसे उचल केले असून त्यातून पाणीटंचाई दूर करावी म्हणून गावकऱ्यांनी ठराव घेतला. परंतू ग्रामसेवकाने त्यालाही केराची टोपली दाखविली असून दोन महिन्यांपासून नागापूर गावात येणे जाणे बंद केले होते.

गावकऱ्यांनी गटविकास अधिकारी किनवट याना निवेदन देऊन म्हटले होते की, ग्रामसेवकाच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कार्यवाही करावी व गावातील पाणीटंचाई दूर करण्याची मागणी केली होती. परंतु त्यांनीही याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केली आहे. ता.३१रोजी ग्रामसेवक गावात आल्याची माहिती मिळताच दीडशे ते दोनशे महिला ग्रामपंचायत कार्यालयात जमा झाल्या व पाणीटंचाई विषयी ग्रामसेवकास प्रश्नांचा भडिमार केला.

परंतु ग्रामसेवकाने उडवा-उडवीचे उत्तर दिल्यामुळे संतप्त महिलांनी त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात डांबून कुलूप लावले. गटविकास अधिकारी आल्या शिवाय कुलूप काढणार नाही, असा पवित्रा घेतला होता. ही माहिती मांडवी पोलिसांना कळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक मल्हार शिवरकर याना मिळताच त्यांनी नागापूर येथे जाऊन महिलांची समजूत काढून पाणीटंचाई दूर करण्यासाठी मी तुमच्या सोबत आहे, असे आश्वासन दिले तेंव्हा ग्रामसेवकाची सुटका झाली. ही समस्या केवळ नागापूर येथेच नसून परिसरात कोरोनाचा प्रभाव सुरू असताना सुद्धा अनेक गावचे ग्रामसेवक गैरहजर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG वाहतुकीसाठी देशात 1,800 किमी पाइपलाइन; कोणकोणत्या राज्यांतून जाणार? काय बदलणार? वाचा...

Sugar Industry: साखर कारखान्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! ४ हजार कोटींचे सॉफ्ट लोन, व्याजाचा भारही सरकार उचलणार

Eknath Shinde: चाकणमधील उद्योगांचे स्थलांतर रोखणार’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्योजकांच्या समस्यांवर घेतले महत्त्वाचे निर्णय

Maratha Reservation: जरांगेंच्या आंदोलनाबाबत छगन भुजबळांचा मोठा दावा; म्हणाले, ‘लढाई ओबीसींविरोधात नाही, सरकारविरोधात’

US-Iran War: आम्हाला व्हेनेझुएला बनवायला निघाले होते; इराणचा ट्रम्प यांच्यावर घणाघात, राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला टोला

SCROLL FOR NEXT