Water-Supply
Water-Supply 
मराठवाडा

पाणीपुरवठा पुन्हा विस्कळित

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - शहराच्या पाणीपुरवठ्याची साडेसाती सुरूच आहे. गेल्या आठवड्यात वारंवार तांत्रिक बिघाड झाल्यानंतर आता गुरुवारी (ता.२०) फारोळा येथे वेलीमुळे शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे अडीच तास शहराचा पाणीपुरवठा बंद पडला होता. तातडीने दुरुस्ती केल्यानंतर पाणी उपसा सुरू झाला असला तरी अनेक भागांत उशिराने, तर काही भागाला गुरुवारी पाणी मिळू शकले नाही.

गेल्या आठवड्यात दोन वेळा तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे जुन्या शहरासह सिडको-हडको भागाला निर्जळीचा त्रास सहन करावा लागला. रात्री-अपरात्री महापालिका व महावितरणचे अधिकारी कर्मचारी काम करून पाणीपुरवठा सुरळीत करीत आहेत. असे असतानाच पुन्हा गुरुवारी फारोळा केंद्रात विजेच्या खांबावर वेलीमुळे शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे शहराकडे येणारे पाणी आणि जलशुद्धीकरण केंद्र बंद पडले. महावितरण आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुरुस्तीचे काम हाती घेऊन अवघ्या अडीच तासांत पाणीपुरवठा पूर्ववत केला. असे असले तरी गुरुवारी शहरातील अनेक भागांना पाणी मिळू शकले नाही, तर काही ठिकाणी उशिराने पाणी आले. शुक्रवारी (ता.२१) दोन तास विलंबाने पाणी मिळेल, असे सूत्रांनी सांगितले. 

सिडकोत आंदोलनाचा इशारा 
एन-सहा येथील नागरिकांनी गेल्या आठवड्यात पाण्यासाठी आंदोलन केले होते. मात्र, अद्यापपर्यंत त्यांना पाणी मिळालेले नाही. त्यामुळे पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

IPL 2024 MI vs LGS : मुंबईचा ‘प्लेऑफ’चा मार्ग खडतर ; लखनौचा विजय,स्टॉयनिसची चमक

Bicycle Crunches: सायकल क्रंच करताना 'या' चुका करू नका, जाणून घ्या योग्य पद्धत

Mumbai News: दुर्गम भागातील नाही, भांडुपमधील प्रकार! डॉक्टरांनी केली टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती, महिलेसह बाळाचा मृत्यू!

Latest Marathi News Live Update : मी आतापर्यंत कोणालाही धमकी दिली नाही- अजित पवार

SCROLL FOR NEXT