वडगाव (काटी, ता. तुळजापूर) ः टॅंकर आल्यानंतर पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांनी केलेली गर्दी.
वडगाव (काटी, ता. तुळजापूर) ः टॅंकर आल्यानंतर पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांनी केलेली गर्दी.  
मराठवाडा

वडगावात 23 किलोमीटरहून टॅंकरने पाणीपुरवठा

सकाळ वृत्तसेवा

तुळजापूर (जि. उस्मानाबाद) ः तालुक्‍यातील वडगाव (काटी) गावाला ऐन पावसाळ्यातही 23 किलोमीटरहून टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. गावाच्या परिसरातील पाण्याचे स्रोत कोरडे पडल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.


तालुक्‍यात दुष्काळाची दाहकता गंभीर आहे. वडगाव (काटी) गावातील सर्वच पाणी स्रोत आटल्यामुळे तामलवाडी (ता. तुळजापूर) येथून सुमारे आठ किलोमीटरवरून पाणीपुरवठा जुलै 2019 पर्यंत करावा लागला. तामलवाडी येथीलही स्रोतातील पाणीपातळी खालावल्याने सांगवी (काटी) येथून 23 किलोमीटरवरून पाणी टॅंकरने वडगाव (काटी) येथे आणावे लागत आहे. सांगवी (काटी), सुरतगाव, तामलवाडीमार्गे वडगाव (काटी) येथे टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे.

वडगाव येथील पाणीपुरवठ्याच्या दोन्ही विहिरी कोरड्या आहेत. वडगाव येथील लोकसंख्या दोन हजार 700 आहे. गावात निम्यापेक्षा जास्त द्राक्षबागा पाण्याअभावी काढून टाकल्या आहेत. काही द्राक्षबागा शेतकऱ्यांनी पाणी विकत घेऊन टॅंकरद्वारे पाणी आणून जगविल्या आहेत. राष्ट्रीय पेयजल योजनेतून सावरगाव तलावातून एक कोटीची पेयजल योजना मंजूर आहे. विहिरीचे कामही झालेले आहे. 

दुष्काळी परिस्थितीचा सामना पावसाळ्यातही करावा लागत आहे. पशुधन जगविण्याचा प्रश्न गंभीर आहे. शेतातून उत्पन्न येण्याची फारशी आशा नाही. शेतीपूरक दुग्धव्यवसायही पाणी, चाराटंचाईमुळे अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांनी कसे जगायचे, असा प्रश्न आहे. 
- सौदागर माळी, शेतकरी. 

गावातील दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. शेतातील पिके पाण्याअभावी सुकली आहेत. सांगवी (काटी) येथील पाणीपुरवठ्याच्या विहिरीतून टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. 
- संपत शेंडगे, सरपंच. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी 2192 वाहनांचा शोध सुरू; 4 हजार 800 मतदान केंद्रे

MI vs SRH IPL Playoffs : टेन्शन फ्री मुंबई वाढवणार हैदराबादच्या ह्रदयाचे ठोके, एक हार अन् खेळ खल्लास?

Latest Marathi News Update : निवडणूक जिंकले तर अभिनय सोडणार- कंगना

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

SCROLL FOR NEXT