Water-Tanker
Water-Tanker 
मराठवाडा

हजार लिटर पाण्याला बारा रुपये

सकाळवृत्तसेवा

लातूर - ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विहिरी व विंधन विहिरीचे अधिग्रहण केले जाते. याकरिता आतापर्यंत संबंधितांना सहाशे रुपये दिले जात होते; पण यात टॅंकरच्या फेऱ्या कमी झाल्या तरी पैसे मात्र तेवढेच दिले जात होते. आता शासनाने प्रति हजार लिटर पाण्यासाठी १२ रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. अधिग्रहित विहिरीच्या पाण्याच्या दरावर शासनाने नियंत्रण आणले असले तरी खासगी टॅंकरच्या पाण्याच्या दरावर आता नियंत्रण आणण्याची गरज आहे. 

टंचाईच्या कालावधीत ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या पिण्याची पाण्याची सोय करण्यासाठी विहिरी अथवा अन्य जलाशयातून पिण्याकरिता पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने खासगी मालकांचे जलसाठे अधिग्रहण 
केले जाते. अशा वेळी खासगी मालकांचे जलसाठे अधिग्रहित करण्यात आल्यानंतर त्यांच्या मालकांना मोबदला देण्यात येतो. आतापर्यंत अशा मालकांना पाणी उचलण्यासाठी साधन सामग्रीशिवाय ४६० रुपये, तर पाणी उचलण्यासाठी साधन सामग्रीसह ६०० रुपये देण्यात येत होते; पण हे मालक एक दोन टॅंकरच पाणी देत होते. उर्वरित पाणी ते खासगी टॅंकरला देत होते. हे शासनाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आता अधिग्रहित पाण्याच्या स्रोतातून टॅंकर भरण्यासाठी पुरवण्यात येणाऱ्या पाण्याकरिता प्रति हजार लिटर १२ रुपये देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. पहिल्यांदाच शासनाने पाण्याचा दर ठरवला आहे. त्याची आता तातडीने अंमलबजावणी केली जाणार आहे. गेल्या वर्षी पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे यावर्षी शहरासह ग्रामीण भागात मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे खासगी टॅंकरचे दरही वधारले आहेत. या खासगी टॅंकरच्या पाण्याच्या दरावरही शासनाने नियंत्रण आणण्याची गरज आहे.

महापालिकेने दहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा सुरू करताच, खासगी टॅंकरचालकांनी भाव वाढवले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Elections 2024: नगरमध्ये PM मोदींनी लालूंवर सोडले टीकास्त्र! मुस्लिम आरक्षणावरून सुरू झाला वाद, काय म्हणाले?

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

Mother's Day 2024: 'मदर्स डे' निमित्त आईसोबत करा दक्षिण भारतातील 'या' सुंदर ठिकाणांची भटकंती

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : कोल्हापूर-हातकणंगलेमध्ये मतदानावरुन वाद

SCROLL FOR NEXT