मुख्‍य समन्‍वयक डॉ. कैलास डाखोरे व प्रमोद शिंदे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
मराठवाडा

हवामान विभाग ठरला सर्वोत्तम

सकाळ वृत्तसेवा

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखील भारतीय समन्‍वयित कृषी हवामानशास्‍त्र संशोधन प्रकल्‍पांतर्गत असलेल्‍या ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना विभागास नवी दिल्ली येथील भारतीय हवामान विभागाच्या वतीने सन २०१८ सालचा देशातील सर्वोत्‍कृष्‍ट केंद्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ग्‍वालियर येथील राजमाता विजयाराजे सिंधिया कृषी विद्यापीठात ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेच्‍या वार्षिक आढावा राष्‍ट्रीय बैठकीत बुधवारी (ता. १८) पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

देशात १३० कृषी हवामान केंद्र कार्यरत

भारतीय कृषी मंत्रालय व पृथ्‍वी विज्ञान मंत्रालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने भारतीय हवामानशास्‍त्र विभागाच्‍या ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेंतर्गत देशात १३० कृषी हवामान केंद्र कार्यरत असून परभणी विद्यापीठातील केंद्र २००७ साली सुरू झाले. या केंद्राच्‍या वतीने पिकांची पेरणीपूर्व ते पीक काढणीपर्यंत प्रत्‍येक अवस्‍थेतील शेतातील कामाचे हवामान आधारित नियोजन कसे करावे, याचा सल्‍ला व मार्गदर्शन देण्‍यात येते.

हेही वाचा...  ‘या’ जिल्ह्यातील क्रीडा संकुल कात टाकणार !


पन्‍नास लाखांवर शेतकऱ्यांपर्यंत पोचले
 या केंद्राच्‍या वतीने मराठवाड्यातील जिल्‍हापातळीपर्यंत शेतकरी बांधवांना आठवड्यातून दोन वेळा मंगळवार व शुक्रवार कृषी हवामान सल्‍ला दिला जातो, यात पुढील पाच दिवसांसाठी पाऊस, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, दिशा व ढगांची स्थिती या हवामान घटकांचा समावेश असतो. या आधारे कृषी सल्‍ला दिला जातो. जिल्‍ह्यानिहाय आकाशवाणी, दूरदर्शन, वर्तमानपत्रे, कृषी विज्ञान केंद्रे, किसान पोर्टल एसएमएस, मोबाईल अॅप्‍स, व्‍हॉट्स अॅप ग्रुप, संकेतस्‍थळ, ब्‍लॉग आदींच्‍या माध्‍यमातून पन्‍नास लाख पेक्षा जास्‍त शेतकऱ्यांपर्यंत पोचविला जातो. या वेळोवेळी प्रसारित केलेल्‍या हवामानातील बदलातील सावधानतेच्‍या इशारामुळे अनेक शेतकऱ्यांना आपले होणारे शेतीतील नुकसान प्रत्‍यक्ष व अप्रत्‍यक्ष टाळणे शक्‍य होत आहे. या कार्याचा गौरव म्‍हणून देशातील सर्वोत्‍कृष्‍ट केंद्र म्‍हणून वनामकृविच्‍या ग्रामीण मौसम सेवा केंद्रास सन्‍माननित करण्‍यात आले. 

व्‍यवस्‍थापकीय संचालकाच्या हस्ते गौरव
नवी दिल्‍ली येथील भारतीय हवामान विभागाचे व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ. एम. मोहापात्रा यांच्‍या हस्‍ते बुधवारी (ता. १८) ग्रामीण कृषी मौसम सेवा योजनेचे मुख्‍य समन्‍वयक डॉ. कैलास डाखोरे व प्रमोद शिंदे यांनी स्‍वीकारला. कार्यक्रमास ग्‍वालियर येथील कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. एस. के. राव, जबलूपर येथील अटारीचे संचालक डॉ. अनुपम मिश्रा, भारतीय कृषी हवामान विभागाचे प्रमुख डॉ. के. के. सिंग, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सहायक उपसंचालक (कृषी विस्‍तार) डॉ. रणधीर सिंग, ग्‍वालियर कृषी महाविद्यालयाचे अधिष्‍ठाता डॉ. जे. पी. दीक्षित, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. एस. एन. उपाध्‍याय, कार्यक्रम आयोजक डॉ. यू. पी. एस भथुरिया आदींची उपस्थिती होती. या बैठकीत वनामकृवि शास्‍त्रज्ञ लिखित ‘हवामान आधारित शेती व्‍यवस्‍थापन’ पुस्तिकाचे विमोजन मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. 

 


शास्‍त्रज्ञांचे पथक कार्यरत
 वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील योजना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण व संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. योजनेचे मुख्‍य समन्‍वयक डॉ. कैलास डाखोरे आहेत. तसेच यात संशोधन सहयोगी प्रमोद शिंदे, डॉ. यू. एन. आळसे, प्रा. डी. डी. पटाईत, डॉ. ए. टी. दौंडे, डॉ. सी. बी. लटपटे, डॉ. विनोद शिंदे, डॉ. राहुल बगेले, प्रा. ए. टी. शिंदे, पांडुरंग कानडे आदी शास्‍त्रज्ञांचे पथक कार्यरत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dattatray Bharne on Sugar Prices : साखरेच्या दरवाढीचा शेतकऱ्यांना फायदा; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचे मत

Koyna Dam Water Level: कोयना धरण आज 100 टीएमसीचा टप्पा गाठण्याची शक्यता;धरणात किती आहे पाणीसाठा वाचा

Pune Real Estate : पुण्यात घरांच्या विक्रीत तब्बल २१ टक्के घट; देशातील प्रमुख शहरांत काय आहे स्थिती? धक्कादायक अहवाल समोर

Marathi News Live Updates : भोंगवली सबस्टेशनविरोधात कापूरहोळमध्ये आज रास्ता रोको

Mumbai Police: मुंबईतील १५ ठाण्यांची सीमा नव्याने ठरणार, पोलिसांचा हद्दीचा वाद मिटणार; कोणत्या ठाण्यांचा समावेश?

SCROLL FOR NEXT