weather update Rain forecast monsoon Aurangabad Osmanabad Latur hingoli  esakal
मराठवाडा

Rain Update : हिंगोलीच्या नऊ मंडळांत अतिवृष्टी

औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांच्या काही भागातही पाऊस

सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : ‘ऑक्टोबर हीट’ ची प्रचिती येत असताना मराठवाड्याच्या काही भागात काल रात्री व गुरुवारी पावसाच्या सरी कोसळल्या. हिंगोली जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या पावसाने नऊ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झली. नांदापुर मंडळात सर्वांधिक १०५.५ मिलीमीटर पाऊस झाला.जिल्ह्यात काल दिवसभर व रात्री पाऊस झाला. जिल्ह्यातील तीसपैकी आठ मंडळांत अतिवृष्टी झाली. यात हिंगोली तालुक्यातील सिरसम, बासंबा, माळहिवरा, वसमत तालुक्यातील हट्टा, कळमनुरी तालुक्यातील वाकोडी, नांदापुर, डोंगरकडा, वारंगा तर सेनगाव तालुक्यातील गोरेगाव मंडळाचा समावेश आहे. या पावसामुळे काढणीस आलेल्या सोयाबीन पिकाचे नुकसान होण्याची भीती आहे.

उस्मानाबादेत शिडकावा

उस्मानाबाद शहरात आज सायंकाळी पावसाचा शिडकावा झाला. दिवसभर ढगाळ वातावण होते. सूर्यदर्शन झाले नाही. दरम्यान, तुळजापूर शहरासह परिसरात सकाळी पाऊस झाला. तालुक्यातील सिंदफळ परिसरातही पावसाने हजेरी लावली.

लोहाऱ्यात सोयाबीनचे नुकसान

लोहारा (जि. लातूर) शहरासह परिसरात सायंकाळी पाच ते सातच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत रिपरिप सुरू होती. जोरदार पावसामुळे रास करण्यासाठी काढून ठेवलेल्या सोयाबीनचे नुकसान झाले आहे.

औरंगाबाद शहरात सरी

औरंगाबाद शहराच्या काही भागात काल रात्री पावसाने हजेरी लावली. आज ढगाळ वातवरण होते. दुपारी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. आजच्या पावसाची नोंद ११.२ मिलीमिटर झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDAच्या अधिकाऱ्यांनी केला कोट्यवधींचा घोटाळा, ५ जणांवर निलंबनाची कारवाई; मंत्री झिरवाळांनी दिली माहिती

जॅक मॅकगर्कची १४ चेंडूंत फिफ्टी अन् १९ चेंडूंत ९६ धावा; वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात वाचला

Sugarcane Price Protest ₹5,500 Per Tonne : साखर कारखान्यांची कोंडी! ऊसदर आंदोलनाची धग दारावर; शेतकरी संघटना साडेपाच हजारांवर ठाम

Navratri Day 7: नवरात्रीच्या सातव्या दिवशी अशी करा माता कालरात्रीची पूजा! जाणून घ्या मंत्र, नैवेद्य, देवीचे स्वरूप अन् महत्व...

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट; भूजल पातळीत अडीच ते साडेतीन मीटरची घट

SCROLL FOR NEXT