Jalna Rain Update sakal
मराठवाडा

Jalna Rain Update : जालन्यात तासभर जोरदार पाऊस; दिवसभर अधूनमधून रिमझिम सरी; छत्री, रेनकोटचा वापर सुरू

वातावरणातील बदलामुळे डासांचे प्रमाण ही वाढले

सकाळ वृत्तसेवा

जालना : पावसाळा सुरू होऊन महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर यंदाच्या पावसाळ्यात गुरूवारी (ता.सहा) जालनेकरांना जोरदार पावसाचा अनुभव मिळाला आहे. दुपारी सव्वाचार ते साडेचार वाजेनंतर एक तास पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. त्यामुळे शहरातील सखल भागात पावसाची पाणी साचले होते. शहरासह जिल्ह्यात ही ठिकठिकाणी पावसाने हजेरी लावली.

यंदा जिल्ह्यात मान्सून उशिरा दाखल झाला. त्यात शहरात मागील काही दिवसांपासून केवळ ढगाळ वातावरण आणि पावसाची भुरभुर होत होती. त्यामुळे उकाड्यात ही भर पडला होता. शिवाय वातावरणातील बदलामुळे डासांचे प्रमाण ही वाढले होते.

त्यामुळे जालनेकर उकाड्यासह डासांमुळे हैराण झाले होते. शिवाय जालनेकरांना मोठ्या पावसाची महिनाभरापासून प्रतीक्षा होती. गुरूवारी सकाळीच शहर पावसाची रिपरिप सुरू झाली होती. मात्र, अकरा वाजेनंतर पावसाने पुन्हा उघडीप दिली.

त्यानंतर साडेतीन वाजेच्या सुमारास पुन्हा रिमझिम पावसाला सुरवात झाली. काही वेळानंतर पावसाचा जोर वाढ गेल्याने सुमारे एक तास शहरात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. मात्र, सायंकाळी साडेपाच ते पावणेसहा वाजे दरम्यान पावसाचा जोर कमी झाला.

मात्र, रात्री उशिरापर्यंत शहरात अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू होती. गुरूवारी झालेल्या पावसाने जालनेकरांना यंदाच्या पावसाळ्यात पहिल्या पावसाचा अनुभव मिळाला. शिवाय उकाड्यापासून दिलासा ही मिळाला. अनेकजण हातात छत्री घेऊन, काहीजण रेनकोट परिधान करून मार्गक्रमण करताना दिसून आले.

विविध भागात नाल्या तुंबल्या

शहरात यंदाच्या पावसाळ्यात पहिलाच जोरदार पाऊस झाल्यानंतर शहरातील अनेक भागातील रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले होते. याचे प्रमुख कारण म्हणजे शहरातील तुंबलेल्या नाल्यामुळे पाण्याच लवकर निचराच झाला नाही. त्यामुळे पहिल्याच पावसाचा नगरपालिकेच्या नालेसफाई मोहीम उघडी पडल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu Kashmir: काश्मीरच्या कुलगाममध्ये पुन्हा टार्गेट किलिंग; मजुरांवर दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या तरुणाचा मृत्यू

उपमुख्यमंत्र्याच्या बैठकीला हजेरी, घरी जाताच घेतली ४५ लाखांची लाच; बीडमध्ये विभागीय वनअधिकाऱ्यांला रंगेहात पकडलं

Commonwealth Games 2026: पाच मिनिटांत दुसरे सुवर्ण! हर्ष सिंगची ज्यूदोत 'Golden' कामगिरी; भारतीय जवानाने प्रतिस्पर्धीला आसमान दाखवले

MBBS Bond: एमबीबीएस डॉक्टरांचा ‘बॉण्ड’ अखेर रद्द! राज्य शासनाचा मोठा निर्णय; वाढत्या विद्यार्थी संख्येमुळे धोरणात बदल

Dhom Dam: वाईत धोक्याची घंटा! धोम धरणाचा विसर्ग वाढला; महागणपती मंदिरात घुसले पुराचे पाणी

SCROLL FOR NEXT