file photo 
मराठवाडा

शेतातील बांधावरच बांधली लगीनगाठ

गणेश पांडे

परभणी : टाळेबंदीमुळे दोन वेळा लग्न सोहळा लांबणीवर पडला. परंतु, परिवारातील थोरा मोठ्याची तळमळ पाहून एका युवकाने प्रशासनाकडून दिलेल्या चाकोरीबद्ध आराखड्यात बसून थेट शेतातील बांधावरच मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नसोहळा उरकला. केवळ विवाह करून तो युवक घरी गेला नाही, तर लग्नानंतर लगेच गरजूंना धान्य व मास्कचे वाटप करून स्वतःच्या अर्धांगिनीसोबत सोमवारी (ता.चार) गृहप्रवेश केला.

हेही वाचा :  रेड झोनमधील व्यक्तींना ‘या’ जिल्ह्यात ‘नो एन्ट्री’
परभणीतील शंकरनगर भागातील किरण प्रकाश सपाटे या नववराचा विवाह सोमवारी रोहीपिंपळगाव (ता. मुदखेड, जि. नांदेड) येथील शीतल कचरू केळकर हिच्याशी आगळ्या-वेगळ्या वातावरणात पार पडला. नववर-वधूनी अनेक तांत्रिक व प्रशासकीय अडचणींचे सोपस्कार पार पाडीत जणू अग्निदिव्यच पूर्ण केल्याचे दिसून आले. सहा महिन्यांपूर्वी किरणचा विवाह शीतलशी ठरला होता. यापूर्वी सहा एप्रिल ही विवाहाची तारीख निश्‍चित झाली होती. त्यानंतरही एक तारीख निश्‍चित करण्यात आली. परंतु, लॉकडाउन वाढतच गेले आणि या विवाह सोहळ्याता मुहूर्त गाठता येईनासा झाला. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीचा विचार करून किरण सातत्याने विवाहच्या दृष्टीने विचारात होता. त्याचा मित्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचा जिल्हा सरचिटणीस कृष्णा कटारे यांच्याशी त्याने या संदर्भात चर्चा केल्यानंतर दोन मे रोजी ऑनलाइन अर्ज प्रशासनाकडे दाखल केला. मात्र, जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली.


कोरोना टेस्टनंतर दिली परवानगी
दरम्यान, प्रशासनाकडे सर्व प्रकारची कबुली देत किरणसह सोबत जाणारे कृष्णा कटारे व कुणाल गायकवाड या तिघांनीही स्वतःची कोरोना टेस्ट केली. तिकडे मुलगी शीतलचीही कोरोना टेस्ट करण्यात आली. त्याचे अहवाल आल्यानंतर प्रशासनाने दिलेल्या परवानगीनुसार अगदीच पोलिस पाटील, सरपंच, मुलीचे आई, वडील व मुलाच्या दोन मित्रांसह हा सोहळा रोहीपिंपगळगाव येथील शेतात नियमांचे काटेकोरपालन करीत पार पडला.

गरजूंना किट वाटून गृहप्रवेश
नव वर-वधूनी लग्न सोहळा आटपल्यानंतर परभणीत पुन्हा एकदा स्वतःची वैद्यकीय तपासणी केली. महापालिकेच्या बेघर निवारात असलेल्यांना मास्कचे वाटप केले. ११ गरजू कुटुंबांना धान्याच्या किटचे वाटप करून गृहप्रवेश केला.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT