file photo 
मराठवाडा

नांदेडात मिलनचे ‘कल्याण’, पोलिसांकडून अड्डा उध्वस्त 

प्रल्हाद कांबळे

नांदेड : इतवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मिलन मटक्याचे ‘कल्याण’ होत आहे. अशाच एका अड्ड्यावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात सात जुगारी अटक करण्यात आले. त्यांच्याकडून नगदी १९ हजार ११० रुपये व अन्य साहित्य असा २० हजाराचा एवज जप्त केला. ही कारवाई शनिवारी (ता. सात) रात्री हबीब टॉकीज परिसरात केली. 

हबीब टॉकीजच्या परिसरात अनेक अवैध धंदे जोमात चालतात. परवाना लॉटरी दुकानामध्ये मटका, जुगार असे अवैध धंदे सर्सासपणे सुरू आहे. त्याकडे स्थानिक पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे दुर्लक्ष आहे. हे दुर्लक्ष अर्थपूर्ण व्यवहारातून केल्या जात असल्याची चर्चा आहे. विनापरवाना मटका अड्ड्यावर इतावारा पोलिसांनी शनिवारी रात्री छापा टाकला. 

हे आहेत जुगारी

यावेळी चंद्रकांत गोविंदराव जाधव, गणेशलाल रामराव चौधरी, संजय गंगाधरराव बुटल्यावाले, शेख सुलतान शेख रहिम, रुपचंद हिरालाल लंकाढाई, सुरजसिंह जुगवासिंह ठाकूर आणि देविदास पांडूरंग साबळे यांना ताब्यात घेतले. अड्ड्यावरून रोख १९ हार ११० रुपये व अन्य साहित्य असा २० हजाराचा एवज जप्त केला. पोलिस हवालदार केश गुट्टे यांच्या फिर्यादीवरुन इतवारा पोलिस ठाण्यात वरील सात अरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक श्री वसमतकर करीत आहेत.  

हेही वाचा-नांदेडमध्ये सव्वादोन लाख शेतकरी वेटिंगवर


पर्समधील विस हजार लंपास 
इतवारा ठाण्यात गुन्हा दाखल 

नांदेड : पर्समधील विस हजार रुपये अज्ञात चोरट्यानी अलगद लंपास केले. ही घटना जुना नांदेड भागातील मनियार गल्लीमध्ये रविवारी (ता. आठ) डिसेंबरच्या सायंकाळी सव्वापाचच्या दरम्यान घडली. 

शहराच्या इतवारा परिसरातील मिल्लतनगरमधील मालनबी अब्दुल वहीद ही महिला आपल्या जवळील सोन्याचे गळसर (दागिणा) विक्री करण्यासाठी सराफा बाजारात रविवारी सायंकाळी गेली होती. गळसर विकुन त्याचे आलेले २० हजार ५०० रुपये तीने आपल्या पर्समध्ये ठेवले. सराफा बाजारातून ती पायी मनियार गल्लीमधून घराकडे जात होती. रस्त्यात असलेल्या एका बांगडीच्या दुकानावर ती खरेदी करण्यासाठी थआंबली. तिने काही बांगड्या खरेदी केल्या. मात्र या गडबडीत तीचे लक्ष विचलीत करून तेथे उपस्थित असलेल्या चोरट्यांनी पर्समधील वरील रक्कम लंपास केली असेल असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. 

चोरट्याविरुद्ध चोराची गुन्हा दाखल

बांगडीच्या दुकानासमोरुन तिच्‍या पर्समधील ठेवलेले २० हजार ५०० रुपये अज्ञात चोरट्यानी लंपास केले होते. घरी गेल्यानंतर आपली पर्सची चैन उघडी दिसली. तर आतमधील पैसे गायब झाल्याचे तिच्या लक्षात आले. तिने सर्वप्रथम रस्त्यावर येऊन शोधाशोध केली मात्र पैसे काही सापडले नाही. यावरून मालनबी यांनी इतवारा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन इतवारा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोराची गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस हवालदार श्री. रसुल करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

SCROLL FOR NEXT