मराठवाडा

मागेल त्याला टँकर, मागेल त्याला चारा छावणी : चंद्रकांत पाटील

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : अपुऱ्या पावसामुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. ही परिस्थिीत निवारणासाठी शासनातर्फे उपाययोजना सुरु आहे. दुष्काळाची भीषणता वाढत असून, यात मागेल त्याला टँकर आणि मागेल त्यास चारा छावणी देण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (ता.2) सांगितले. 

कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे करमाड उपबाजार समिती येथे सुरु करण्यात आलेल्या चारा छावणीस रविवारी महसूलमंत्री पाटील यांनी भेट देत पाहणी केली. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष भागवत कराड, आमदार अतुल सावे, बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. या भेटीत त्यांनी पशुपालकांशी संवाद साधला.

पाटील म्हणाले, राज्यभरात दुष्काळाची स्थिती आहे. या स्थितीत शेतकरी, पशुपालकांना आवश्‍यक त्या बाबी शासनस्तरावरून पुरविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. चारा छावण्याला लागत असलेले पाण्याचे टँकर शासनाकडून पुरविण्यात येत आहे. त्यामुळे चारा छावणी मालकांचा पाण्याचा खर्चही शासनस्तरावरून होत आहे. शिवाय प्रति जनावर शासनाकडून 100 रुपयांचे अनुदानही छावणी मालकांना देण्यात येत आहे. त्यामध्ये केंद्र सरकार 70 रुपये तर राज्य शासनाकडून 30 रुपये आहेत.

शेळ्या मेंढ्यांच्या छावण्याही सुरू करण्यात येणार आहे. या संदर्भात स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन पाटील यांनी केले. यासह चारा छावणीत असलेल्या पशुपालकांना पाच रुपयात पोटभर जेवण देण्यात येत आहेत. यासह येथील सुविधांची माहिती विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिली. 

छावणीत सुमारे दोन हजार जनावरे 

बाजार समितीतर्फे करमाडच्या चारा छावणीत आजूबाजूच्या 35 खेड्यातील दोन हजार जनावरे आहेत. शासनाच्या निर्णयानुसार मुबलक चारा, पाणी जनावरांना उपलब्ध करून देण्यात येतो आहे. चाऱ्यासाठी आवश्‍यक कुटी यंत्र, मनुष्यबळाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती राधाकिसन पठाडे यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Politics : पुण्यात ठाकरे गटाला जबरदस्त धक्का; सुतार–भोसलेंची भाजपमध्ये थेट एन्ट्री; कोथरूड–येरवड्यात राजकीय भूकंप!

DG Loan Scheme: महाराष्ट्र पोलिसांच्या घराचं स्वप्न साकारणार! ‘डीजी लोन’ योजना सुरू, राज्य सरकारचा मोठा निर्णय, लाभ कसा मिळणार?

Sheikh Hasina Statement : बांगलादेशात हिंदू तरूणाच्या निर्घृण हत्येच्या घटनेवर शेख हसीना म्हणाल्या, ‘’हे तेच लोक आहेत का?, ज्यांना...’’

Crypto Market Update: बिटकॉइन 89,000 डॉलरच्या वर! 2026 मध्ये क्रिप्टोमध्ये तेजी की घसरण? क्रिप्टोकरन्सी डॉलरची जागा घेईल का?

Pan - Aadhaar Linking : फ्रीमध्ये घरबसल्या आधारला पॅनकार्ड कसे लिंक करायचे? हे लगेच पाहा एका क्लिकवर, शेवटची तारीख 31 डिसेंबर

SCROLL FOR NEXT