File Photo 
मराठवाडा

कोण म्हणतय... रॅगिंग होत नाही, येथे प्रकार घडूनही विद्यार्थिनी चिडीचूप

शिवचरण वावळे

नांदेड : विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींची सिनियर्सकडून मागील चार दिवसांपासून मध्यरात्री रॅगिंग होत असल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचे गुरुवारी (ता.पाच) सकाळी उघड झाले आहे.

रात्री तीनपर्यंत उभे करून रॅगिंग
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्व विद्यार्थ्यांनी मिळुन आठवडाभरापूर्वीच महाविद्यालयात ‘मानवी अवयव’ प्रदर्शन भरविले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर सध्या विद्यार्थ्यांची स्नेहसंमेलनाची जोरात तयारी सुरू आहे. यातच प्रथम वर्षात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना सिनिअर्सकडून मध्यरात्री तीन वाजेपर्यंत वसतिगृहात उभे राहण्यास सांगण्यात येत आहे. गेल्या चार दिवसांपासून सिनियर्सकडून हा प्रकार केला जात असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.

हेही वाचा -

रॅगिंग विरोधात विद्यार्थ्यांशी बंद खोलीत संवाद
नाशिक आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी काही महिण्यापूर्वीच डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची भेट घेऊन रॅगिंग होणार नाही. याबद्दल नेमकी काय काळजी घ्यावी, या संदर्भात शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकात म्हस्के यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली होती. या वेळी राज्यात रॅगिंग विरोधात विद्यार्थ्यांशी बंद खोलीत संवाद साधला होता. तरी, देखील काही महिने लोटत नाहीत तोच डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालयातील सिनिअर विद्यार्थ्यांकडून रॅगिंगचा प्रकार घडल्याचे उघड झाले आहे.

हेही वाचा -

अनेक महाविद्यालयात रॅगिंग कमेटीच नाही
सिनिअरच्या विचित्र वागण्यामुळे ज्युनिअर विद्यार्थी अपमानित होऊन अनेकवेळा टोकाचे पाऊल उचलुन गळफास घेणे वा आत्महत्या केल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयात घडल्या आहेत. विद्यार्थ्यांकडून अशा गंभीर घटना होऊ नयेत यासाठी प्रत्येक महाविद्यालयात ‘ॲँटी रॅगिंग कमिटी’ स्थापन करणे बंधनकारक आहे. मात्र, अजही अनेक महाविद्यालयात ‘अँटी रॅगिंग कमिटी’च स्थापन करण्यात आलेली नाही. जेव्हा महाराष्ट्रात एखाद्या महाविद्यालयात ॲँटी रॅगिंगचा गंभीर प्रकार उघडकीस येतो तेव्हाच मात्र अनेक महाविद्यालय प्रशासनाला जाग येते आणि अँटी रॅगिंग समिती स्थापन करण्यासाठी महाविद्यालय स्तरावर हालचाली सुरू होताना दिसून येतात. दीड दोन वर्षापूर्वी नांदेडच्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात अशाच प्रकारची रॅगिंग झाल्याने समिती स्थापन करण्यासाठी हालचाली झाल्या होत्या.

रॅगिंगची तक्रार प्राप्त नाही
रॅगिंग झाल्याची चर्चा होत असल्याने, मी स्वतः प्राथमिक चौकशी करून वस्तीगृहातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि वस्तीगृहातील सर्व विद्यार्थिनींकडे याबद्दल विचारणा केली मात्र, कुणीही रॅगिंगचा प्रकार घडल्याचे सांगण्यासाठी पुढे आले नाही. प्राथमिक चौकशी झाली, अधिक तपास करण्यासाठी त्रिसदस्य महिला समितीद्वारे चौकशी करणार करण्यात येणार आहे.
- डॉ. एस. आर. वाकोडे, प्रभारी अधिष्ठाता.
-------
या टोल फ्री नंबरवर करा तक्रार १८०० - १८० - ५५२२
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mallikarjun Kharge: मणिपूर दौरा म्हणजे ढोंग व दिखावा; खचलेल्या लोकांचा अपमान केल्याचा खर्गेंचा पंतप्रधान मोदींवर आरोप

मी शिवभक्त, विष पचवतो; आईच्या नावाने शिवीगाळ प्रकरणी PM मोदी पुन्हा बोलले

Sharad Pawar : महाराष्ट्र एकसंध ठेवण्यासाठी जातीपातीचे राजकारण थांबवावे: शरद पवार

India-Pakistan Cricket Match : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून कोल्हापुरात ठाकरे आक्रमक, हॉटेलमध्ये सामना दाखवल्यास...

पाकिस्तानविरुद्ध सामन्यात अर्शदीप सिंगला संधी मिळणार? कशी असेल भारतीय संघाची प्लेईंग XI?

SCROLL FOR NEXT