hingoli sakal
मराठवाडा

Hingoli News : हिंगोली मतदारसंघ कुणाच्या वाट्याला?

मागील अडीच वर्षांत राज्याच्या राजकारणात दोन मोठे भूकंप झाले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षात उभी फूट पडली. याचा थेट परिणाम जिल्‍ह्याच्या राजकारणावर झाला. त्यामुळे आता लोकसभेच्या हिंगोली मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी जोरकसपणे तयारी सुरू केली.

सकाळ वृत्तसेवा

मागील अडीच वर्षांत राज्याच्या राजकारणात दोन मोठे भूकंप झाले. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षात उभी फूट पडली. याचा थेट परिणाम जिल्‍ह्याच्या राजकारणावर झाला. त्यामुळे आता लोकसभेच्या हिंगोली मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी जोरकसपणे तयारी सुरू केली.

उमेदवार आमचाच असेल, असा दावा प्रत्येक राजकीय पक्षाचे स्थानिक पदाधिकारी करीत आहेत. पण, ही जागा नेमकी कुणाला सुटणार, या प्रश्न अजूनही गुलदस्त्यात आहे. दरम्यान, या निवडणुकीत मतांचे विभाजन होणार हे निश्चित आहे. त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार आहे.

हिंगोली जिल्ह्याचा मागील पाच वर्षांचा विचार केला तर या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष प्रमुख आहेत. पण, याच दोन पक्षात आता फूट पडली आहे. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस नेते दिवंगत राजीव सातव यांनी माघार घेत सुभाष वानखेडे यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली.

दरम्यान, शिवसेनेचे हेमंत पाटील यांनी वानखेडे यांना मात दिली. सध्या या मतदार संघाचे प्रतिनिधित्व पाटील करीत असून, ते मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे महायुतीकडून शिवसेनेची (शिंदे) दावेदारी प्रबळ आहे. त्यादृष्टीने हेमंत पाटील तयारीही करीत आहेत. पण, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीही मतदारसंघात भेटीगाठी वाढवल्या आहेत.

दुसरीकडे या ठिकाणी शिवसेनेचा खासदार असल्याने महाविकास आघाडीत ठाकरे गटानेही दावा केला आहे. मात्र, या ठिकाणी २०१४ च्या मोदी लाटेत काँग्रेसकडून राजीव सातव निवडून आले होते. त्यामुळे यावेळी हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा, अशी मागणी ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी केली.

पण, दुसरीकडे शरद पवार गटाकडूनही दावा केला जात आहे. वंचित बहुजन आघाडीचा जर महाविकास आघाडीत समावेश झाला नाही तर वंचितही मैदानात असणार आहे. त्यामुळे तूर्तास तरी हा मतदार संघ कुणाला सुटणार आणि उमेदवार कोण असणार हे निश्चित नाही. पण, ही निवडणूक चुरशीची होणार आहे, हे मात्र निश्चित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan Interest Rate: एसबीआयनंतर 'या' बँकेचाही झटका! गृहकर्जाचे दर वाढले, सामान्यांना दिलासा नाही

Child Marriage : महाराष्ट्रात पुन्हा बालविवाह! कायद्याला चुकवून अल्पवयीन मुलीचं लग्न अन् अत्याचार, सात महिन्यांची गर्भवती

Vice President Election : NDA चा ‘राजकीय डाव’! उपराष्ट्रपतीपदासाठी सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी, सध्या आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल

Shashikant Shinde: शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा : प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे; 'शेतकऱ्यांसाठी दोन दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे'

Satara News:'स्वातंत्र्यदिनी राष्ट्रवादीकडून पिंपोडेत रास्ता रोको'; रस्ता खाेदल्याने अनेकांचे हातपाय मोडले, आंदोलनस्थळी लोकवर्गणी गोळा

SCROLL FOR NEXT