file photo 
मराठवाडा

का...? उचलले विवाहितेने हे पाऊल

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : सासरच्या सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना माळाकोळी (ता. लोहा) परिसरात रविवारी (ता. पाच) जानेवारी सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी तिच्या सासरच्या मंडळीवर माळाकोळी पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. सहा) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
माळाकोळी (ता. लोहा) येथील शिल्पा उर्फ शीतल अजय कांबळे (वय २३) हिला सासरी लग्नानंतर काही दिवस चांगले नांदवले. दरम्यानच्या काळात तिचा पती व अन्य नातेवाईक घर बांधण्यासाठी माहेराहून पैशाची सतत मागणी करून तिचा मानसिक व शारिरीक छळ करु लागले. परंतु वडिलांची परिस्थिती हलाखीची असल्याने ते पैसे कुठून देणार, म्हणून शीतल सासरचा त्रास सहन करु लागली. वेळप्रसंगी तिचा पती अजय कांबळे हा तिला मारहाण करीत असे. अवढेच नाही तर तिला उपाशी ठेवून सतत टाकून बोलुन अपामानीत करीत होते. सासरी होणारा त्रास तिने आपल्या माहेरी सांगितला होता. परंतु माहेरच्या मंडळीनीही त्याकडे हतबलतेमुळे दुर्लक्ष केले. अनेकवेळा तिच्या पालकांनी पतीला व सासु- सासऱ्याला समजावून सांगितले. परंतु त्यांच्या वागण्यात काही फरक पडला नाही. शितलचा त्रास दिवसेंदिवस वाढत गेला. 

विहीरीत उडी घेऊन आत्महत्या

शेवटी तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. रविवारी (ता. पाच) पहाटेच तिने गावशेजारी असलेल्या बाजीराव भालेराव यांच्या शेतातील विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही माहिती तिच्या माहेरी समजताच एकच आक्रोश झाला. रडारड करत ही मंडळी तिच्या सासरी पोचली. या प्रकरणी अशोक हिरामण कांबळे यांच्या माहितीवरुन सर्वप्रथम कंधार पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आत्महत्या सासरच्या त्रासाला कंटाळूनच

परंतु तिचा विहीरीत पडून मृत्यू झाला नसुन तिने सासरच्या त्रासाला कंटाळुन आत्महत्या केल्याची तक्रार भास्कर सोपानराव ढवळे रा. डोंगरगाव (ता. लोहा) यांनी कंधार ठाण्यात दिली. त्यांच्या फिर्यादीवरुन पती अजय अशोक कांबळे,  अशोक हिरामन कांबळे आणि रमाबाई अशोक कांबळे सर्व रा. माळाकोळी यांच्याविरुध्द आत्महत्येस परावृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आश्रोबा घाटे करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Ahir: ''मी पक्ष सोडलेला नाही...'', शिवसेनेकडून उपसभापतीपदाचा अर्ज भरल्यानंतर सचिन अहिर काय म्हणाले? शिंदेंनी सांगितली तांत्रिक बाजू

Police Officer Transfer: पोलीस खात्यात मोठी उलथापालथ! १० वरिष्ठ अधिकाऱ्यांची नव्या ठिकाणी नियुक्ती; तातडीने रुजू होण्याचे आदेश

Shashank Singh : आचाऱ्याला मारहाण प्रकरणाला नवं वळण! PBKS च्या फलंदाजाने मौन सोडले; म्हणाला, तो आचारी नव्हताच...

लग्नानंतर जोडीदाराने चीट केलं तरीही माफ करायचं... राम कपूरचं धक्कादायक वक्तव्य, आकांक्षा चामोला संतापली, म्हणते-

Aditya Thackeray On Sachin Ahir : सचिन अहिर शिंदे सेनेत जाताच आदित्य ठाकरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, 'काय कमी केलं'

SCROLL FOR NEXT