file photo 
मराठवाडा

शेतकऱ्याने का घेतला गळफास...वाचा सविस्तर 

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना लोहा (ता. हदगाव) शिवारात गुरूवारी (ता. नऊ) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. 

लोहा (ता. हदगाव) येथील खोब्राजी लक्ष्मण टिंबे (वय ५५) यांच्या शेतावर मागील काही वर्षापासून सतत नापिकी होत होती. शेतातील उत्पन्न घटल्याने त्यांना घरगाडा चालविणे अवघड होत होते. त्यामुळे तामसा येथील एसबीआय शाखेतून कर्ज काढले. मात्र यावर्षीही शेतात नापिकी झाली. आता संसाराचा गाडा कसा हाकायचा आणि बँकेचे कर्ज कसे परत करायचे या विवंचनेत सापडलेल्या खोब्राजी टिंबे यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. शेवटी त्यांनी गुरूवारी (ता. नऊ) दुपारी आपल्या शेजाऱ्याच्या शेतात जाऊन आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाची माहिती किरण खोब्राजी टिंबे याने तामसा पोलिसांना दिली. यावरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास फौजदार श्री. जगाडे करीत आहेत.

विमा एजन्टला ८५ हजाराचा आॅनलाईन गंडा

नांदेड : लोहा येथील स्टेट बँक आॅफ इंडिया या शाखेतून अज्ञात हॅकर्सनी चक्क आॅनलाईनद्वारे बँकेचा डाटा वापरून एका विमा एजन्टच्या बँक खात्यातून ८५ हजार रुपये काढून फसवणुक केली. हा प्रकार ता. पाच जानेवारी ते ता. १० जानेवारीच्या काळात सतरावेळा घडला. 

लोहा येथील विमा एजन्ट रामभाऊ काशिनाथ चन्नावार (वय ६९) यांचे स्टेट बॅक आॅफ इंडिया शाखा लोहा येथे खाते आहे. त्यांच्या खात्यातून अज्ञात बँक हॅकर्सनी बँकेचा डाटा वापरुन आॅनलाईन प्रत्येकी पाच हजार या प्रमाणे सतरा वेळा ८५ हजार रुपये काढून घेतले. बॅक खात्यातून पैसे कसे वजा होत असल्याने त्यांनी बँकेत जावून विचारणा केली. बँक अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता चक्क ८५ हजार रुपये काढल्याचे दिसून आले. शेवटी आपली फसवणुक झाली म्हणून रामभाऊ चन्नावार यांच्या फिर्यादीवरुन लोहा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुध्द गुनहा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक भागवत जायभाये करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola Crime : पैशांचा पाऊस पाडण्यासाठी अघोरी पूजा! नरबळी दिल्याचा आरोप; अकोल्याच्या युवकाची इंदूरमध्ये हत्या, मांत्रिकाच्या पूजेचे व्हिडिओ आले समोर

Glasses Cleaning Tips : तुम्हीही शर्ट किंवा टिश्यू पेपरने चष्मा पुसता का? वेळीच थांबा! ही एक चूक लेन्स कायमच्या खराब करू शकते; जाणून घ्या योग्य पद्धत

Corporators Protest : सभेची कार्यपत्रिका वेळेत नाही, प्रस्तावांचा तपशीलही गायब; पुणे महापालिकेच्या नगरसचिव विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण

Marathi News Live Updates : सावरकर मुद्द्यावरून महायुतीची दुटप्पी भूमिका; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा गंभीर आरोप, "शिंदेसेना 'बंच ऑफ थॉट्स' आणि अरुण शौरींचे पुस्तक फाडणार का?" असा थेट सवाल

Pune Traffic : प्रयेजा सिटी परिसरातील भुयारी मार्गाच्या कामामुळे मुंबई-बंगळूर महामार्गावरील वाहतुकीत गुरुवारपासून तात्पुरते बदल लागू

SCROLL FOR NEXT