file photo 
मराठवाडा

कोरोना संक्रमणासाठी गंगाखेड का ठरलं 'हॉटस्पॉट'...वाचा सविस्तर

प्रा.डॉ. अंकुश वाघमारे

गंगाखेड (जिल्हा परभणी) : गंगाखेडचे शहरातील स्वागत समारंभाच्या कार्यक्रमानंतर कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत दिवसेंदिवस वाढ होत गंगाखेड शहर हे कोरोनाचे हॉट स्पॉट केव्हा झाले हे जनतेसह प्रशासनास देखील समजले नाही. कारण यासाठी प्रशासनाची कुचकामी यंत्रणा, कोरोनाच्या तपासणी साठी लागणारा वेळ व नागरिकांचा बेजबाबदारपणा या बाबी गंगाखेडला कोरोनाचे हॉट स्पॉट बनविण्यास जबाबदार आहेत.

कोरोनाच्या काळामध्ये सर्वसामान्य गोरगरीब, मजूर कुटुंबीयांना लग्नासाठी परवानगी नाकारण्यात आल्या. परंतु शहरातील प्रतिष्ठित व्यापारी राधेशाम भंडारी यांच्या मुलाच्या लग्नांचा स्वागत समारंभास लोकप्रतिनिधी , प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, उद्योजक,  शहरातील 500 जन उपस्थित होते. त्यानंतर त्यांच्या कूटूंबातील 60 वर्षीय महिलेस कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील 43 व्यक्तींचे स्वॅब घेतले असता यापैकी दहा व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले. यानंतर प्रशासनास खडबडून जाग आली. व्यापारी राधेशाम भंडारी यांच्याविरोधात गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.  त्यानंतर गंगाखेड शहरात ता. २० जुलै पर्यंत 142 व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या. जिल्हाधिकारी यांनी गंगाखेड येथील कोरोना विषाणूच्या संसर्गास व्यापारी राधेशाम भंडारी यांना जबाबदार धरत पाच लाखाच्या दंडासह स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीची नियुक्ती केली आहे.

तपासणी साठी लागणारा वेळ

कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा प्रशासनातर्फे शोध घेऊन त्यांना काॅरंटाईन केले जाते. व त्यांचे स्वॅब प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले जातात. सदरील अहवाल प्राप्त होण्यासाठी चार ते पाच दिवसाचा वेळ लागत असल्यामुळे विलगीकरण कक्षातील निगेटिव्ह व्यक्तींचा पॉझिटिव्ह व्यक्तींशी संपर्क येतो. अहवाल प्राप्त होण्यास वेळ लागत असल्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीस योग्य वेळी उपचार  मिळत नाहीत. रॅपिड अँटिजन किट उपलब्ध करून देणे आवश्यक आहे अशी औरड  होत आहे.

गोंधळलेले प्रशासन

कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तिंचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे संपर्कातील व्यक्तींची रॅपिड अँटिजन किट माध्यमातून तपासणी करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. संशयीत नागरिकांनी तपासणी केली. निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाल्यानंतर  तपासणी केलेल्या व्यक्तींनी आपले घर गाठले. तब्बल दोन दिवसानंतर प्रशासनाने तपासणी करून अहवाल निगेटिव्ह आले असले तरीही व्यक्तींनी विलगीकरण कक्षात दाखल व्हावे असे आवाहन केले.

व्यापाऱ्यांसह नागरिकांचा बेजबाबदारपणा

गंगाखेड शहरात कोरोनाने शतक पार केलेले असताना संचारबंदी शिथिल झाल्यानंतर काॅरंटाईन केलेल्या व्यापाऱ्यांनी आपले दुकान उघडली होती.तसेच नागरिकांची बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी झुंबड पाहावयास मिळाली. या ठिकाणी नागरिकांनी सोशल डिस्टंसिंग व मास्कचा वापर केलेला नाही. तालुक्यातील नागरिक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जबाबदार पणे वागत नसल्यामुळे कोरोना  विषाणूचा संसर्ग वाढण्यास नागरिकांचा बेजबाबदार महत्त्वपूर्ण ठरला आहे.

कोरोना पासूनच स्वतः नागरिकच स्वतःला वाचवू शकतात

गंगाखेड शहराची परिस्थिती अतिशय विदारक झाली असून कोरोनाग्रस्तांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात पुढे येऊ शकते. नागरिकांनी सामाजिक अंतर व मास्कचा वापर करणे अत्यावश्यक आहे. कोरोना पासून स्वतः नागरिकच स्वतःला वाचवू शकतात. परिस्थिती गंभीर आहे नागरिकांनी जागरूक होणे आवश्यक आहे. विनाकारण कोणीही घराच्या बाहेर येवू नये.
- डॉ. उमाकांत बिराजदार,
 तालुका आरोग्य अधिकारी, गंगाखेड

संपादन- प्रल्हाद कांबळे


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT