file photo 
मराठवाडा

ट्रॅक्टर- दुचाकीच्या धडकेत पत्नी ठार; पती गंभीर जखमी, जिंतूर तालुक्यातील अपघात 

राजाभाऊ नगरकर

जिंतूर ( जिल्हा परभणी ) : अज्ञात ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीस्वार गंभीर. शोभाबाई बबन राठोड ( वय ४२) असे मृत महिलेचे नाव आहे. तर बबन चंदू राठोड (वय ४५) दोघेही रा. पिंपळगाव काजळे तांडा (ता. जिंतूर) असे जखमीचे नाव असून त्यास परभणी येथे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. सदरची घटना सोमवारी (ता. २९) पहाटे साडेपाचच्या सुमारास शहरापासून तीन किलोमीटरवर परभणी महामार्गावर घडली. 

पिंपळगाव काजळे तांडा येथील बबन राठोड व त्यांची पत्नी शोभाबाई राठोड हे दोघे दुचाकीवरुन (एम एच- २२,एयु-७६६८) परभणी येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असतांना विरुद्ध दिशेने वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने भरधाव वेगात येऊन दुचाकीला समोरुन जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिलेच्या डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाल्याने ती जागीच ठार झाली. तर दुचाकीस्वार बबन राठोड हा देखील गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडलेले होता. रस्त्यावरील पादचारी नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना कळवताच बिट हवालदार राजू गायकवाड, श्री. पौळ व शंकर हाके यांनी घटनास्थळी धाव घेऊन १०८ रुग्णवाहिका बोलावून दोन्ही अपघातग्रस्ताना शासकीय रुग्णालयात दाखल केले.

डाॅ.अनीफ खान यांनी शोभाबाईस मृत घोषित केले तर बबन राठोड यांच्यावर डाॅ. खान यांच्या मार्गदर्शनाखाली परिचारिका श्रीमती गावीत, श्रीमती देशमाने, रुग्ण कक्ष सेवक गंगाधर पालवे आदींनी प्राथमिक उपचार करुन पुढील उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. 

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT