मराठवाडा

पत्नीचा गळा दाबून तो गेला पोलिस ठाण्यात! 

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद - पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे पती त्रस्त होता. यातून दोघांत सतत वाद व्हायचे. राग अनावर झाल्याने संतप्त पतीने पत्नीचा दोन्ही हाताने गळा दाबला. यानंतर थेट पोलिस ठाण्यात पोचून आपण पत्नीचा खून केला अशी कबुली त्याने पोलिसांकडे दिली. यामुळे पोलिसही चक्रावले. ही गंभीर घटना शनिवारी (ता.20) सकाळी दहाच्या सुमारास एमआयडीसी वाळूजच्या रांजणगाव शेणपुंजी, पवननगर येथे घडली. 

आनंद सुरेश लोखंडे असे खून करणाराचे नाव आहे. आनंद पत्नी व दोन मुलासोबत मुकुंदवाडी येथे राहत होता. आनंद मजुरी व ऍपेरिक्षा चालवीत होता; परंतु त्याला दारूचे व्यसन असल्याने पती-पत्नीत भांडण होत असे. त्याच्या पत्नीचे एका तरुणासोबत प्रेम होते. त्यातून त्यांचे अनैतिक संबंध निर्माण झाले. पत्नी आठ जुलैपासून घरी नव्हती. ती प्रियकरासोबत गेल्याचे समजल्यानंतर आनंदने पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार ता. 11 जुलैला मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर मुकुंदवाडी पोलिसांनी दोघांना नाशिक येथून आणून तिला पतीकडे सोपविले होते; पण त्यानंतर शनिवारी पुन्हा याच मुद्यांरून दोघांत वाद झाला व त्याने तिचा खून केला. या घटनेनंतर पोलिस शिपाई संतोष जाधव व जयेश साळुंके तसेच पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांनी घटनास्थळी पोचून पाहणी केली. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तत्पूर्वी आनंदला अटक करण्यात आली. 

समज दिली, घरही बदलले 
अनैतिक संबंधाची बाब समजल्यानंतर आनंदने पत्नीला समज दिली. समजाविले; परंतु लपून-छपून ती व तिचा प्रियकर भेटतच होते. समजावूनही पत्नी  ऐकत नसल्याने आनंद निराश होता. त्यातूनच तो पत्नी व दोन मुलांसह रांजणगाव शेणपुंजी येथील आई-वडिलांकडे राहायला आला होता. 

वाद उफाळताच खून 
शनिवारी सकाळी आनंदची आई कामानिमित्त घराबाहेर गेल्या. त्यादरम्यान वडीलही घराबाहेर बसले होते. त्यावेळी घरात आनंद आणि पत्नी यांचे भांडण झाले. ते उफाळून येताच आनंदने पत्नीचा दोन्ही हाताने गळा दाबून खून केला. त्यानंतर तो थेट एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात पोचला व त्याने खुनाची माहिती पोलिसांना दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT