Udgir News
Udgir News 
मराठवाडा

बायकोने झोपलेल्या नवऱ्याला पेट्रोल टाकून पेटवले, उदगीर तालुक्यातील घटना

युवराज धोतरे

उदगीर (जि.लातूर) : पती झोपेत असताना पत्नीने पेट्रोल टाकून पेटवले. यात पती ९० टक्के भाजला आहे. आरोपी पत्नीवर उदगीर येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ग्रामीण पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की शेकापूर (ता.उदगीर) येथे मंगळवारी (ता.दोन) रात्री साडेदहाच्या सुमारास फिर्यादी नारायण शेल्हाळे (वय ३५) यास त्याची पत्नी सुनिता शेल्हाळे हिने पती झोपी गेल्याचे पाहून अंगावर पेट्रोल टाकून काढीने पेटवून दिले.

थोड्या वेळात त्याने आरडाओरड केल्यानंतर लोक जमली व त्यास तात्काळ उदगीर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र ९० टक्के भरल्याने यास आरोग्य प्रशासनाने लातूरला हलविले. या परिस्थितीत गांधी चौक पोलिसांनी या रुग्णांचा जवाब घेऊन संबंधित उदगीरच्या ग्रामीण पोलिस ठाण्याला वर्ग केला. या जवाबावरून बुधवारी (ता.तीन) येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात पत्नी विरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मधुकर जवळकर ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप कुमार वाघमारे यांनी गुरुवारी (ता.चार) शेकापुर येथे भेट देऊन स्थळ पाहणी केली. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक बालाजी पलेवाड हे करीत आहेत.

त्या १३ जणांची विलगीकरण कक्षात रवानगी, एकाला कोरोनाची बाधा

लाच स्वीकारताना पोलिस नाईकला पकडले
देवणी (जि.लातूर) ः दहा हजारांची लाच घेताना वलांडी (ता. देवणी) येथील पोलिस चौकीचे पोलिस नाईक मुरलीधर दंतराव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. येथील पोलिस चौकीत बुधवारी (ता. तीन) दुपारी ही कार्यवाही करण्यात आली. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की तक्रारदार यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात असलेले तक्रार अर्ज प्रकरण मिटविण्यासाठी पंधरा हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती; मात्र तडजोडीअंति दहा हजार रुपयांवर प्रकरण मिटविण्याचे ठरविल्यावरून तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर यांच्याकडे तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक माणिक बेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कुमार दराडे व बाबासाहेब काकडे यांनी सापळा रचून आरोपी मुरलीधर दंतराव यांना लाचेच्या रकमेसह पकडले. या घटनेमुळे वलांडीसह परिसरात खळबळ उडाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT