Mohanrao Jagtap sakal
मराठवाडा

Mohanrao Jagtap : उमेदवारी देणाऱ्या पक्षात प्रवेश करणार; भाजप नेते मोहनराव जगताप

उमेदवारी देणाऱ्या पक्षात प्रवेश करणार असून विधानसभा निवडणूक लढण्याचे रणशिंग भाजपाचे विधानसभा प्रमुख मोहन जगताप यांनी फुंकले.

सकाळ वृत्तसेवा

माजलगाव : उमेदवारी देणाऱ्या पक्षात प्रवेश करणार असून विधानसभा निवडणूक लढण्याचे रणशिंग भाजपाचे विधानसभा प्रमुख मोहन जगताप यांनी फुंकले. शहरातील जुना मोंढा भागातील मैदानावर आयोजित कार्यकर्ता निर्धार मेळाव्यात रविवारी (ता. २९) बोलत होते.

मेळाव्याच्या अध्यक्षस्थांनी छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष बाजीराव जगताप हे होते तर माजी नगराध्यक्ष सहाल चाउस, अर्जुन गायकवाड, विलास बडे, श्रीकृष्ण सोळंके, डॉ. सुशील लोढा, संतोष यादव यांची उपस्थिती होती. बोलतांना श्री. जगताप म्हणाले की, मागील २० वर्षांपासून मतदारसंघामध्ये काम करत असताना ऐनवेळी डावलण्यात येते.

त्यामुळे आता आपण आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देणाऱ्या पक्षात प्रवेश करणार असून उमेदवारी न मिळाल्यास जनतेच्या तिकीटावर लढणार असल्याचे सांगीतले तर विद्यमान आमदार सोळंके यांचेवर कडाडून टीका करत केवळ विकासाचे स्वप्न दाखवून मतदारसंघवासीयांचे प्रश्न कायमच ठेवले असल्याचे सांगीतले.

आठवडी बाजार, एमआडीसीमधील टेक्स्टाईल पार्क, पालिके अंतर्गत झालेली निकृष्ट दर्जाची कामे यासह विकासात्मक असलेली महत्वाची कामे झाली नसल्याचा आरोप केला. अध्यक्षीय समारोपात बोलतांना माजी आमदार बाजीराव जगताप यांनीही आगामी काळात मोहन जगताप यांचे पाठीशी रहावे, असे आवाहन केले.

यावेळी धारूरचे माजी नगराध्यक्ष अर्जुन गायकवाड, नानाभाउ शिंदे, शरद यादव, रामदीप डाके, बप्पासाहेब देशमुख, उमेश मोगरेकर यांनी मनोगत व्यक्त केले. आभार डॉ. सुशिल लोढा यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुणे शहर ठप्प! पावसाने रस्ते जलमय, प्रमुख चौकांमध्ये वाहतूक विस्कळित

Deglur Bhukhand: कर्मचाऱ्यांसाठीचे भूखंड इतरांच्या घशात? देगलूर प्रकरणात चौकशीचे आदेश, सहकार क्षेत्रात खळबळ

Mumbai Agra Highway : मुंबई-आग्रा महामार्गावरील 'या' कोंडीतून होणार कायमची सुटका! राणेनगरमध्ये नक्की काय बदलणार? पाहा महत्त्वाची अपडेट

ICC Ranking: जसप्रीत बुमराहला जबरदस्त धक्का... मॅट हेन्रीने न्यूझीलंडचा ३६ वर्षांचा दुष्काळ संपवला; Joe Root पुन्हा टॉपर ठरला

Kolhapur Football : विषय हार्ड, लय भारी...; फिफाने घेतली कोल्हापूरच्या फुटबॉलची दखल, रोनाल्डो, नेमारच्या फोटोंना दिल्या मराठी कमेंट

SCROLL FOR NEXT