Prashant Bamb Sakal
मराठवाडा

Winter Session 2023 : गंगापूर, खुलताबाद मतदारसंघातील विकासकामांसाठी; अधिवेशनात ७२ कोटींचा निधी मंजूर - प्रशांत बंब

आमदार प्रशांत बंब यांचा धडाका

बाळासाहेब लोणे

गंगापूर : नागपूरला सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मांडण्यात आलेल्या पुरवणी अर्थसंकल्पात गंगापूर, खुलताबाद मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी कोटी ५७ लाख ३७ हजार इतका भरघोस निधी मंजूर करण्यात आमदार प्रशांत बंब यांना यश मिळाले आहे.

या निधीतून रेल्वे पुल, रस्त्यावरील लहान पुल यासह विविध कामे केली जाणार आहे. ही सर्व कामे पूर्णत्वास आल्यानंतर गंगापूर खुलताबाद मतदार संघाच्या लौकिकात मोलाची भर पडणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

राज्यात भाजप महायुतीची स्थापना झाल्यानंतर आमदार प्रशांत बंब यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी शेकडो कोटींचा निधी शासनाकडून मंजूर करुन घेतला. त्यात पुन्हा या निधीची भर पडल्याने विकासकामांना अधिक गती मिळणार आहे.

सध्या मंजूर कामात लासुर स्टेशन येथे रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम करणे (१७ कोटी ३९ लाख), देवगाव, गंगापुर लासुर रस्त्यावर गट क्र. 34 लासुर स्टेशन येथे प्रस्तावित रेल्वे उड्डाणपुलाकरिता पोच रस्त्याची भुसंपादनासह सुधारणा करणे (१० कोटी), काटेपिंपळगाव लासुर डोणगाव दिवशी रस्ता सुधारणा करणे (७० लाख), वैरागड, बाभुळगाव,

डोणगाव टाकळी जांभाळा रस्ता सुधारणा करणे (७ कोटी ५० लाख), वाळुज कमळापुर घाणेगाव नारायणपुर कासोडा रस्ता काँक्रीटीकरण करणे (१० कोटी), वाळुज रामराई इटावा एकलहेरासिमेंट काँक्रीट स्त्याचे बांधकाम व पुलाचे बांधकाम करणे (३ कोटी ५० लाख), ढोरेगाव सावखेडा वाळुज लांझी रस्ता सुधारणा करणे (९ कोटी),

गाढेपिंपळगाव, वाहेगाव, मांजरी, संजरपुर रस्ता सुधारणा करणे (४ कोटी ८० लाख), गाढेपिंपळगाव, वाहेगाव, मांजरी, संजरपुर रस्ता लहान पुलाचे बांधकाम करणे (२ कोटी), खुलताबाद लामणगाव टाकळी राजेराय रस्ता डांबरीकरण व पुलाचे बांधकाम करणे ( ३ कोटी ४४ लाख ५२ हजार),

हर्सुल जटवाडा रस्ता रुंदीकरणासह सुधारणा करणे. (१ कोटी), खुलताबाद तालुक्‍यातील ताजनापुर, शिरोडी रस्ता सुधारणा करणे (१ कोटी), खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी शिरोडी रस्ता सूधारणा करणे (५० लाख) या कामांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT