Ausa News  
मराठवाडा

लातूर जिल्ह्यात मुलांविना वडिलांवर अंत्यसंस्कार, नातेवाईकांनी पार पाडले शेवटचे कार्य

केतन धवन

उजनी (जि.लातूर) ः कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे ठाणे जिल्ह्यात कामानिमित्त वास्तव्यास असणारे उजनी (ता. औसा) येथील पाच युवक वडिलांच्या अंत्यसंस्काराला येऊ शकले नाहीत. मन हेलावून टाकणारी अशी ही घटना येथील राधानगर भागात घडली. येथील रहिवासी लक्ष्मण धोंडीबा खरटमोल (वय ७७) यांचे शनिवारी (ता. १८) राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. खरटमोल हे त्यांच्या पत्नी गुंडाबाई यांच्यासमवेत उजनी येथे राहत होते.

त्यांना पाच मुले होती. गोपाळ खरटमोल, जगन्नाथ खरटमोल, नवनाथ खरटमोल, यमनाथ खरटमोल, दिलीप खरटमोल अशी त्या मुलांची नावे. पाचही मुलांचे लग्न झालेले. पाच सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे. परंतु पाचही मुले गेल्या अनेक वर्षांपासून कामानिमित्त ठाणे येथे वास्तव्यास आहेत. वडील आजारी असल्याची माहिती मुलांना अगोदरच देण्यात आली होती. त्यावेळी त्यांना येऊ देण्यासाठी उजनी ग्रामपंचायतीकडून तसे पत्रही ऑनलाइन पाठवण्यात आले होते. परंतु ते ज्या भागात राहत होते त्या परिसरात दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असल्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांना ठाणे जिल्ह्यातून बाहेर पडू दिले नसल्याची माहिती नातेवाइकांनी दिली.


शनिवारी वडिलांच्या निधनाची बातमी समजताच पाचही मुले पुन्हा गावाकडे येण्यासाठी निघाली असता याही वेळेस त्यांना बाहेर पडू दिले नाही. गेले दोन महिने झाले. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यभर टाळेबंदी आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याअंतर्गत प्रवास करण्यावर निर्बंध घातले आहेत. मुंबई, ठाणे ही शहरे लाल क्षेत्रात असल्यामुळे तिथे पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रविवारी (ता. १९) अखेर मुलांची वाट न पाहता नातेवाईक व ग्रामस्थांच्या मदतीने लक्ष्मण खरटमोल यांच्यावर सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. पाच मुले असूनही शेवटचा निरोप घेताना मात्र कोणीही हजर राहू शकला नाही. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs NZ 2nd T20I : १८ धावांत ५ विकेट्स! दक्षिण आफ्रिकेचा दारूण पराभव, न्यूझीलंडच्या दोन गोलंदाजांनी पूर्ण मॅच फिरवली

पठ्ठ्याने १६ iPhone तर चोरले पण एक चुकी पडली महागात, पोलिसांनी ट्रेनमधून घेतलं ताब्यात; नेमकं काय घडलं?

शिवराज्याभिषेक करणाऱ्या गागाभट्टांचे वंशज आता काय करतात? त्यांनी जपलेली छ. शिवाजी महाराजांच्या हस्ताक्षरातील पत्रे पाहिलीत का?

Latest Marathi News Live Update : भारतासाठी दिलासा! ४६,५०० टन LPG घेऊन 'नंदा देवी' टँकर गुजरातच्या वदिनार बंदरात दाखल

Share Market Fraud : सावध व्हा! नाशिकमध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली २७ लाखांना चुना; बापलेकावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT