सुनिता भावले 
मराठवाडा

गावाच्या शिवारात येताच पत्नीचा दुचाकीवरुन पडून मृत्यू

भास्कर सोळंके

जातेगाव (जि.बीड) : माहेरी भावाबरोबर रक्षाबंधन साजरा करून सासरी पतीबरोबर दुचाकीवरून परतत असताना गाव शिवारात प्रवेश करताच पाठमागे बसलेल्या पत्नीचा दुचाकीवरून पडल्याने (Beed) दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.२२) चोपड्याची वाडी शिवारात सायंकाळी उशिरा घडली. सुनिता अशोक भावले (वय २५, रा.भावले वस्ती, ता.गेवराई) (Gevrai) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. रविवारी (ता.२२) रक्षाबंधन असल्याने पती अशोक भावले आणि दोन मुलासह माहेरी बागपिंपळगाव येथे भावांना राखी बांधण्यास गेली होती. दुपारनंतर दुचाकीवरून (Accident) आपल्या पती आणि दोन मुलांसह गावाकडे परत निघाले. वस्तीजवळ खड्डा चुकवताना दुचाकी खड्ड्यात आदळल्याने पाठमागे बसलेली सुनिता भावले खाली पडल्या. त्यांना गंभीर मार लागल्याने जागीच बेशुद्ध झाल्या.

यामुळे तात्काळ उपचारास नेत असतानाच वाटेतच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सकाळी रक्षाबंधन उरकून परत येणाऱ्या बहिणचा मृत्यू भावांना दुख:द धक्कादायक ठरला आहे. सुनिता भावले यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, सासु व सासरे असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Skincare Tips: चेहऱ्यासाठी प्रत्येक वेळी घरगुती उपाय नसतात फायदेशीर! जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

SCROLL FOR NEXT