crime sakal
मराठवाडा

Udgir News : प्रसूतीनंतर उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू! डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा पतीचा आरोप

वागदरी (ता. उदगीर) येथील सामान्य रुग्णालयातील गरोदर माता प्रसुतीसाठी दाखल झालेली २५ वर्षीय महिलेचा प्रसूतीनंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. १०) घडली.

सचिन शिवशेट्टे

उदगीर - वागदरी (ता. उदगीर) येथील सामान्य रुग्णालयातील गरोदर माता प्रसुतीसाठी दाखल झालेली २५ वर्षीय महिलेचा प्रसूतीनंतर उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. १०) घडली आहे. शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन, मयताच्या नातेवाईकांनी डॉक्टराच्या हालगर्जीपणामुळे मुत्युस जबाबदार असणार्‍यावर कार्यवाही करण्याची मागणी करत राञी उशारापर्यत ठिय्या मांडला होता.

सविस्तर माहीती आशी की, पल्लवी कुणाल मोरे (वय-२५) ही गरोदर माता प्रसूतीसाठी उदगीर येथील सामान्य रुग्णालयात बुधवारी दाखल करण्यात आले होते. नैसर्गिक प्रसुती होत नसल्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया करून प्रस्तुती करण्यात आली. प्रसूतीनंतर तिची तब्येत खालावल्यामुळे तिला खाजगी रुग्णालयात दुपारी उपचारासाठी नेण्यात आले.

उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे खाजगी रुग्णालयाचे डॉ. अनुप चिकमुर्गे यांनी शहर पोलीस ठाण्यास कळवले. यावरुन बुधवारी रात्री अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. दरम्यान मयत महिलेच्या कुटबाने सामान्य रुग्णालयातील डॉक्टर व खाजगी डॉक्टरांनी उपचारा दरम्यान निष्काळजीपणा केल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला व तिच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.

शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी मयत महिलेच्या नातेवाईकांची समजूत काढून लेखी जबाब देण्यास सांगीतले त्यानुसार मयत महिलेचे पती कुणाल मोरे यांनी शहर पोलिसात लेखी जवाब दिला. त्यानंतर त्या महिलेचा मृत्यदेह सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. गुरुवारी दुपारी शवविच्छेदनानंतर तिचा मृतदेह नातेवाईकांच्या हवाली करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कविता जाधव या करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs SLW T20I: स्मृती मानधनाने रचला नवा विश्वविक्रम, शफाली वर्माचीही मिळाली साथ; भारताचा श्रीलंकेविरुद्ध विजयाचा चौकार

Pune Municipal Election : पुण्यात मोठा ट्विस्ट! मनपा निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार? उद्या अधिकृत घोषणा होण्याची शक्यता

RPI Protest : जागावाटपावरून रिपाइंची नाराजी; भाजप कार्यालयासमोर सोमवारी धरणे आंदोलन!

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

१११ वर्षांनंतर विदर्भातील पहिला मानाचा पट पुन्हा सुरू, विदर्भ केशरी शंकरपट मैदानाची धावपट्टी गाजणार

SCROLL FOR NEXT