Madinabi Shah sakal
मराठवाडा

Sillod News : रुग्णवाहिकेतच महिलेची प्रसूती; नवजात शिशूसह मातेचा मृत्यू

सिल्लोड शहरातील शासकीय उपजिल्हा रुग्णालयातून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी रेफर केलेल्या गर्भवती महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती होऊन नवजात शिशूचा मृत्यू झाला.

सकाळ वृत्तसेवा

सिल्लोड - शहरातील शासकीय उपजिल्हा रुग्णालयातून छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचारासाठी रेफर केलेल्या गर्भवती महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती होऊन नवजात शिशूचा मृत्यू झाला, तर घाटीत पोचल्यानंतर महिलेचादेखील मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. १) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. मदिनाबी जमील शाह (वय २४, रा. आमठाणा, ता. सिल्लोड) असे मृत महिलेचे नाव आहे.

मदिनाबी शाह यांना शनिवारी प्रसूती वेदना सुरू झाल्यामुळे आमठाणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल केले. याठिकाणी प्राथमिक उपचार करून सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. याठिकाणी सायंकाळी सातच्या सुमारास भरती करण्यात आले.

येथेदेखील उपचार करून रात्री साडेबाराच्या सुमारास १०२ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून छत्रपती संभाजीनगर येथे पाठविण्यात आले. रस्त्याने फुलंब्री व चौकादरम्यान महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली. घाटी रुग्णालयात पोचल्यानंतर तेथे उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नवजात शिशूला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वेळेत रक्त उपलब्ध झाले नाही

मदिनाबी यांना घाटीत दाखल केल्यानंतर काही तासांनंतर रविवारी पहाटे पाचच्या सुमारास त्यांचाही मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मृत गर्भवती महिलेच्या शरीरात रक्ताची मोठी कमी असल्यामुळे त्यांना रक्ताची आवश्यकता होती. परंतु, सिल्लोड येथे वेळेत रक्त उपलब्ध न झाल्यामुळे संबंधित महिलेस रात्री उशिरा उपचारासाठी घाटीत पाठविले. यामुळेच नवजात शिशूसह महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृत महिलेचे नातेवाईक दुखात असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

उपजिल्हा रुग्णालयात सुविधांची वाणवा

घडलेल्या या घटनेमुळे मात्र पुन्हा एकदा उपजिल्हा रुग्णालयातील प्रसूती विभागामध्ये आवश्यक सुविधांची वाणवा असल्याचे दिसून आले. सुविधांची वाणवा असल्यामुळे प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना जोखीम पत्करूनच येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती व्हावे लागत असल्याची परिस्थिती आहे.

संबंधित महिलेची तपासणी केल्यानंतर तिचा बीपी वाढलेला होता. शरीरात रक्ताचीही कमतरता होती; तसेच बाळाचे ठोके लागत नसल्यामुळे तातडीने संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठविले.

- डॉ. पांडुरंग चौधरी, वैद्यकीय अधिकारी, सिल्लोड उपजिल्हा रुग्णालय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mhada House: पालिकेने थकवला म्‍हाडाचा महसूल! सहा वर्षांपासून २२५ घरांचा मोबदला नाही

BAN vs WI 2nd ODI: वेस्ट इंडिज संघाने घडवला इतिहास, वन डे क्रिकेटमध्ये असा वर्ल्ड रेकॉर्ड कोणीच केला नव्हता...

Numerology 2025: 'हा' मूलांक असणारे लोक मोठे अधिकारी बनतील, वाचा भाग्यशाली दिवस आणि रंग कोणता असेल?

Eknath Shinde: ‘स्थानिक’मध्ये महायुतीच! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बहुमताचा विश्वास

Beed News : दिवाळी साजरी करताना हातातच फुटला फटाका; ६ वर्षाच्या मुलाला गमवावी लागली दृष्टी, बीडमधील दुर्देवी घटना...

SCROLL FOR NEXT