LeopardAttack 
मराठवाडा

Breaking : बिबट्याचा महिलेवर हल्ला, आष्टी तालुक्यात सलग तिसऱ्‍या दिवशी बिबट्याचा उपद्रव

अनिरुद्ध धर्माधिकारी

आष्टी (जि.बीड) : आष्टी शहराजवळील मंगरूळ येथे बिबट्याने काल शनिवारी (ता.२८) माय-लेकावर हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली असताना आज दुसऱ्‍या दिवशी रविवारी (ता.२९) तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी येथे पुन्हा बिबट्याने एका महिलेवर हल्ला करून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात सुदैवाने महिला बचावली असली तरी मानेवर गंभीर जखमा झाल्या आहेत. शालनबाई शहादेव भोसले (वय ६०, रा. बोराडेवस्ती, पारगाव जोगेश्वरी) या महिलेवर आज रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला.

पारगावलगत बोराडे वस्ती असून, शालनबाई यांचे शेत वस्तीच्या जवळ आहे. आज सकाळी अकराच्या सुमारास त्या गवत आणण्यासाठी रानात गेल्या होत्या. गवत कापत असताना बिबट्याने अचानक त्यांच्यावर झेप घेतली. या हल्ल्यात शालनबाई यांच्या मानेवर गंभीर जखमा झाल्या असून त्यांना तातडीने आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरुडी, किन्ही या दुसऱ्‍या टोकाला असलेल्या गावानंतर त्याच्या विरुद्ध टोकाच्या आष्टी शहर व पारगाव जोगेश्वरी या गावातही बिबट्याचे हल्ले सुरू झाल्याने दहशत वाढत चालली आहे.

संपादन - गणेश पिटेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Scheme : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! 30 जूनपूर्वी 'हे' काम न केल्यास पुढील 2,000 रुपयांचा हप्ता अडकणार; कृषी विभागाचा इशारा

Fan Cooling Tips : सीलिंग फॅनची स्पीड कमी झालीये? नवीन पंखा विकत घेण्यापूर्वी करून बघा 'हे' काम, येईल एसीसारखी थंड हवा

FIFA WORLD CUP 2026: मृत्यूला हरवून 'तो' मैदानावर उतरला; वर्ल्ड कपमध्ये पहिला गोल करताच ढसाढसा रडला... कोण आहे Raúl Jiménez?

Latest Marathi News Live Update : काँग्रेस बुडणारं जहाज, विलिनीकरण झालं तरी आम्हालाच फायदा होईल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला

आता IRCTC वेबसाईट हँग होणार नाही! १५ जुलैपासून नवी प्रणाली लागू; तत्काळ तिकीट बुकिंगचा त्रास संपणार?

SCROLL FOR NEXT