Police-Station
Police-Station 
मराठवाडा

महिला चार्लींची ४० निर्जन स्थळांवर नजर

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - महिलांच्या सुरक्षेसाठी महिला चार्ली पोलिस पथकांची नियुक्ती करून शहरात ४० निर्जन स्थळांची यादी पोलिसांनी काढली आहे. या निर्जनस्थळी महिला चार्ली पथक, दामिनी पथक गस्त घालणार आहे. या स्थळी रात्री विद्युत दिव्यांची व्यवस्था करावी, असे पत्रही पोलिस दलाने महापालिका प्रशासनाला पाठविल्याची माहिती सूत्रांनी दिली.

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शहरातील निर्जन स्थळे शोधून तिथे सुरक्षा व्यवस्था करण्याचे आदेश पोलिसांना तीन वर्षांपूर्वी दिले होते. यानंतर सप्टेंबर २०१५ ला तात्पुरत्या उपाययोजनाही झाल्या. परंतु, विद्युत दिव्यांची व्यवस्था तेथे करण्यात आली नाही. 

यानंतर शहरात वर्ष २०१७ मध्ये निर्जन स्थळांची उपाययोजना थंड बस्त्यात होती. त्यानंतर पुन्हा आता शहरातील एकूण चाळीस निर्जन स्थळांची यादीच पोलिसांनी काढली आहे. तेथे नव्याने स्थापन केलेले महिला चार्ली पथक गस्त घालणार आहे. महिलांवरील अत्याचार, छेडछाड रोखण्यासंदर्भात डिसेंबर २०१८ मध्ये पोलिस आयुक्तालयात आढावा बैठक झाली होती. यात निर्जन स्थळांबाबत चर्चा करून प्रकाश व्यवस्थेबाबतही खल झाला. उपाययोजनेचा भाग म्हणून महापालिकेला पोलिसांनी निर्जन स्थळांची यादी दिली असून प्रकाश व्यवस्था करावी, याबाबत पत्राद्वारे सुचविण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK : जडेजाची अष्टपैलू कामगिरी, चेन्नईचा पंजाबवर विजय

Rohit Pawar Video : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT