घटनास्थळी पाहणी करताना पोलीस. 
मराठवाडा

वाळूज-पंढपूर येथे साडेतीन लाखांचा दरोडा, महिला गंभीर

बातमीदार

वाळूज (जि. औरंगाबाद) -  गाढ झोपेत असलेल्या महिलेवर दरोडेखोरांनी प्राणघातक हल्ला करून दागिन्यांसह साडेतीन लाखांचा ऐवज लंपास केला. वाळूज परिसरातील पंढरपूर येथे एका अपार्टमेंटमध्ये मंगळवारी (ता.1) पहाटे 3.20च्या सुमारास हा प्रकार घडला. यातील गंभीर जखमी महीलेवर घाटीत उपचार सुरू आहेत. 

पंढरपूर येथील जिल्हा परिषद शाळा व देवगिरी बॅंकेच्या पाठीमागे "विठ्ठल भूमी' हे तीन मजली अपार्टमेंट आहे. यातील ए-2 मध्ये रोहिणी सोमनाथ कांबळे (वय 45) या पंकज आणि अभिजीत या दोन मुलांसह राहतात. त्यातील एक हॉटेल व्यावसायिक असून दुसरा खासगी ट्रॅव्हल्सवर चालक आहे. सोमवारी (ता.30) अभिषेक दुचाकी आणण्यासाठी पुणे येथे गेला
होता. आई रोहिणी समोरच्या तर भाऊ बेडरूममध्ये झोपला होता. मध्यरात्री तीनच्या सुमारास तीन दरोडेखारांनी त्यांच्या घराचा पाठीमागील दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. यावेळी पंकज व रोहीणी हे गाढ झोपलेले होते. प्रथम दरोडेखारांनी पंकज झोपलेल्या बेडरूमचा दरवाजा बंद केला. त्यानंतर रोहीणी कांबळे झोपलेल्या खोलीत घुसले व ऐवज शोधू लागले. याचवेळी रोहीणी यांना जाग आली. त्यांनी विरोध केला असता दरोडेखोरांनी रॉडने त्यांच्या डोके, मान, कपाळावर वार केले. याचदरम्यान अभिषेक हा पुणे येथून रात्री 3 च्या सुमारास घरी आला. त्यावेळी त्याला 1 दरोडेखोर बसलेला दिसला. कुणीतरी आल्याचे पाहताच बसलेला दरोडेखोर व अन्य दोघांनी शेजारील अशोक सर्जेराव काटे यांच्या भिंतीवरून उडी मारून अंधारात पळ काढला. यावेळी अभिषेक घराच्या समोरील दाराकडे गेला असता त्याला दार बाहेरून व आतून बंद असल्याचे दिसले. त्यामुळे त्याने पाठीमागील बाजूने असलेल्या स्वयंपाक घराचे दार पाहिले असता त्याला स्वयंपाक घराच्या दरवाजाचा कोंडा तुटलेला व दार उघडे असल्याचे लक्षात आले. तातडीने आत जाऊन पाहीले असता आई रोहिणी या जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात बेशुध्द पडलेल्या दिसल्या. तर भाऊ पंकज हा पाठीमागील घरात कोंडलेला दिसला. यावेळी त्याने आरडाओरड करून मित्र अमोल, कार्तिक व चुलता कैलास कांबळे यांना फोन केले. त्यांच्या तसेच नातेवाईकांच्या मदतीने आईला प्रथम बजाजनगर व नंतर घाटीत दाखल केले. या घटनेत दरोडेखोरांनी रोहिणी यांच्या गळ्यातील 1 लाख 20 हजार रूपये किमतीच्या 2 सोन्याच्या साखळ्या, 24 हजार रुपये किमतीचे 8 ग्रामचे मणी मंगळसूत्र, 12 हजार रुपये किमतीच्या 2 ग्राम वजनाच्या अंगठ्या तसेच बॅग आणि कपाटातील 2 लाख 4 हजार 500 रूपये रोख असा 3 लाख 60 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला. 

दरोड्याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक राहुल रोडे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत गंभीरराव, सतीश पंडित आदींनी श्वान व ठसे तज्ज्ञांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी अभिषेक सोमनाथ कांबळे
यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल रोडे करीत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026: महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर! तुमचा तालुका आहे का चेक करा... जिल्हानिहाय संपूर्ण यादी समोर

वानर थेट वाइन शॉपमध्ये घुसला; दारू प्यायली अन् पुढे जे घडलं ते पाहून लोकंही थक्क

Latest Marathi News Live Update : लालबागच्या राजाचं 24 तासांनंतर विसर्जन, भाविकांचे पाणावले डोळे; समुद्रकिनारी मोठी गर्दी

तेव्हा मी अरिजीतपेक्षा जास्त लोकप्रिय होतो... अभिजीत सावंतचं मोठं विधान; म्हणतो- त्याला कुणी ओळखत नव्हतं

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

SCROLL FOR NEXT