file photo 
मराठवाडा

फुकट साडीच्या नावाखाली महिलेला लुटले

प्रल्हाद कांबळे

नांदेड : काकु..काकु गरीब महिलांना पुढे साड्या वाटप सुरु आहे. तुम्हाला साडी पाहिजे असेल तर तुमच्या गळ्यातील दागिने काढून पिशवीत बांधून ठेवा अशी बतावणी करून ३८ हजाराचा ऐवज दोन भामट्यांनी लंपास केला. ही घटना धर्माबादमधील नवा मोंढा रस्त्यावर रविवारी (ता. १५) दुपारी एक वाजता घडली. 

धर्माबाद शहरात नवा मोंढा परिसरात रविवारी दुपारी कामानिमित्त याच शहराच्या सरस्वतीनगरमधील काळसा तुळशीराम देवाकर (वय ५२) ह्या आल्या होत्या. त्यांना दोन भामट्यांनी हेरले. काकु, पलिकडे गरीब महिलांना मोफत साड्या वाटप सुरू आहे. तुम्हाला जर साडी पाहिजे असेल तर तुम्ही तिकडे जा. परंतु तुमच्या अंगावर सोन्याचे दागिने पाहून ते तुम्हाला साडी देणार नाहीत. म्हणून तुम्ही तुमच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढून एका पिशवीत एका कापडात बांधून ठेवा. असे म्हणताच त्या महिलेनी अंगावरील दागिने काढले. मात्र तिला घाईघाईत बांधता येत नसल्याने एका भामट्यांनी काकु द्या माझ्याकडे मी बांधून देतो. 

भामटे पसार 

असे विश्‍वासात घेऊन तिने अंगावरील ३४ हजाराचे सोन्याचे दागिने व नगदी चार हजार असे ३८ हजार रुपये या भामट्यांच्या हातात दिले. कापडात बांधून दिले असे सांगून त्या महिलेला पुढे पाठविले. तोपर्यंत दागिने व नगदी रुपये घेऊन त्या भामट्यांनी पोबारा केला. समोर जावून पाहते तर कोणीच साडी वाटप करीत नव्हते. अनेकांना तिने विचारले मात्र साडीबद्दल वाटपाबद्दल कोणीच तिला काही सांगितले नाही. शेवटी ती परत ज्यांनी तिला सांगितले होते त्यांच्याकडे गेली. मात्र तेथेही कोणीच नाही. पिशवीतील बांधून दिलेल्या कापडातील दागिने पाहते तर दागिने गायब झाल्याचे तिच्या लक्षात आले. यावरुन आपली फसगत झाली. म्हणून तिने धर्माबाद पोलिस ठाणे गाठले. पोलिस निरीक्षक भागवत जायभाये यांनी तिची सर्व हकीकत ऐकूण घेतली. त्यानंतर तिच्या फिर्यादीवरुन धर्माबाद पोलिस ठाण्यात अनोळखी भामट्यांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश कराड करीत आहेत.  

आमिषाला बळी पडू नका 

शहरात असा कोणीच मोफत साड्या किंवा किंमती वस्तु वाटप करीत नाही. त्यामुळे आमिषला बळी पडून नका. असी बतावणी करून तुमची फसवणुक करणारी टोळी सक्रीय झाल्याचे दिसून येते. पंधरा दिवसापूर्वी नांदेडच्या श्रीनगर भागात एका महिलेची अशीच फसवणुक करून भामट्यांनी तिला चांगलेच गंडवले. त्यानंतर सोने उजळून देतो म्हणूही एका महिलेची फसवणुक झाली आहे. असा प्रकार जर भविष्यात आपल्यासोबत होत असेल तर नागरिकांनी किंवा महिलांनी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन नांदेड पोलिसांनी केले.
दत्ताराम राठोड, अतिरिक्त पोलिस अधिक्षक, नांदेड. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill on IND vs SL Draw: "२५० षटकं अन् सलग तीन दिवस फिल्डिंग..." फॉलोऑननंतरही सामना ड्रॉ राहिल्याबद्दल गिल काय म्हणाला?

Marathi News Live Updates : टीएमसी कार्यालयात गोंधळ उडाला

Manora News : कृषी केंद्राचा परवाना रद्द न करण्यासाठी २५ हजारांची लाच; मंडळ कृषी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Hotel Business : हॉटेल व्यवसायाला ग्राहकांच्या अविश्वासाचा फटका! एफडीए कारवाईनंतर शहरातील रेस्टॉरंटमध्ये २० टक्क्यांपर्यंत घट

Pune News : स्थायी समितीतील निर्णय फिरवला! टक्केवारीच्या ‘दुर्गंधी’ने स्वच्छ सेवक साहित्याविना

SCROLL FOR NEXT