Latur Crime Sasal
मराठवाडा

Latur Crime : देहविक्री करून घेणाऱ्या महिलेला पोलीसांनी केल अटक

पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

लातूर : देहविक्री व्यवसाय करून घेणाऱ्या येथील एका महिलेस पोलिसांनी बुधवारी (ता.१९) अटक केली. या प्रकरणात पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका केली आहे.

येथे एक महिला स्वतःच्या घरात हा प्रकार करीत असल्याची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक अंकिता कणसे, उपनिरीक्षक श्यामल देशमुख यांच्या पथकाने घरी छापा टाकला.

त्यावेळी देहविक्री करून घेणाऱ्या महिलेसह अन्य दोन महिला तेथे आढळल्या. त्यांच्याकडून मोबाइल, रोख रक्कम व इतर साहित्य असा १२ हजार १७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. महिलेस अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निदा खान HR नव्हती, POSH च्या तक्रारीही नाहीत; TCSकडून निवेदन, तर मुंब्र्यात राहणाऱ्या पतीने ठावठिकाणा सांगितला पण...

LPG Price: होर्मुझ खुला! LPG सिलेंडर आता स्वस्त होणार का? भारताच्या किमतींवर मोठा परिणाम?

एमआयएमची आणखी एक नगरसेविका अडचणीत, शपथपत्रात दिली खोटी माहिती

Washim News: भर उन्हात गॅससाठी नागरिकांचा जीव मुठीत; शेलूबाजारमध्ये संताप उसळला; पहाटेपासून रांगा, तरीही सिलिंडर मिळत नाही

Latest Marathi News Live Update : पुणे विमानतळावर अपघातामुळे अनेक विमान रद्द

SCROLL FOR NEXT