Cases 
मराठवाडा

साडेतीन हजार रोडरोमिओंना दामिनी पथकाचा दणका

जालिंदर धांडे

बीड - महिला व मुलींच्या छेडछाडीच्या घटना वाढल्यामुळे पोलिस अधीक्षकांच्या पुढाकाराने जिल्ह्यात १२ दामिनी पथकांची स्थापना केली. २०१८ पासून आतापर्यंत छेड काढणाऱ्या साडेतीन हजार रोडरोमिओंना दामिनी पथकाने धडा शिकवला आहे. पथकाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांना आतापर्यंत चार हजार वेळेस भेटी देऊन मार्गदर्शन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील अनेक भागांतून महिला व मुली विविध कारणांसाठी शहरात येतात. मात्र, काही ठिकाणी रोडरोमिओंचे टोळके बसलेले असते. ये-जा करणाऱ्या महिलांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जिल्ह्यात १२ दामिनी पथकांची स्थापना केली आहे. २०१८ पासून आतापर्यंत ९७५ महिला बचत गटांना या पथकांनी कायद्याची माहिती दिली. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी पथकांनी गस्त वाढविली. आता महिला व मुलींना मोबाईलवरही तक्रारी देता येणार आहेत. पोलिस ठाण्यातही आता जाण्याची गरज नाही. तक्रादाराचे नाव गुपित ठेवण्यात येते. 

पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, पोलिस उपअधीक्षक भास्कर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक भारत माने, पोलिस उपनिरीक्षक राणी सानप यांच्या पथकाने कारवाया केल्या. 
महिला व मुलींच्या सोयीसाठी दामिनी पथकाकडे मोबाईलवर तक्रार करण्याची सोय आहे. तक्रारींची दखल घेऊन ताबडतोब कारवाया करण्यात येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paithan-Sambhajinagar Highway Crash: पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात; अर्धवट रस्त्याच्या कामामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू

आदिवासी विद्यार्थ्यांचं पुण्यातील आंदोलन स्थगित! 'वर्षा' बंगल्यावर आंदोलन करण्याचा उपोषणकर्त्यांचा इशारा

Rahul Gandhi: ''काँग्रेसचा इतिहासच दलितविरोधी'', राहुल गांधींच्या आरोपांनंतर भाजपचा जोरदार पलटवार

ISRO GSLV F-17 launch: आठ महिन्यांनंतर इस्रोची उड्डाणशृंखला पुन्हा सुरू; जीएसएलव्ही एफ-१७ वरून भूस्थिर कक्षेत ईओएस-०५ दूरसंवेदन उपग्रहाचे ४ सप्टेंबरला प्रक्षेपण

Nepal Flood Miracle Rescue: नेपाळच्या महापुरातून ९७ वर्षीय गुणा माया बोहरांची चमत्कारिक सुटका; ढिगाऱ्यांतून फुललेली जगण्याची उमेद

SCROLL FOR NEXT