latur  latur
मराठवाडा

आता बचतगटाच्या महिला बनवणार एलईडी बल्ब

लातूर जिल्हा नियोजन समितीचा हातभार; अजनी व तगरखेड्यात पथदर्शी युनिट

विकास गाढवे

लातूर: बचत गटाच्या महिलांचा पारंपरिक व्यवसायाचा दृष्टिकोन बदलून त्यांना नव्या व आधुनिक व्यवसायासाठी उभारी देण्याचे प्रयत्न महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियानांतून सुरू आहेत. या प्रयत्नांचे पुढचे पाऊल टाकत अभियानाने बचतगटांच्या महिलांना एलईडी बल्ब तयार करण्याचे प्रशिक्षण दिले आहे. प्रशिक्षणामुळे महिला बल्ब तयार करण्यासाठी सज्ज झाल्यानंतर अजनी बुद्रुक (ता. शिरूर अनंतपाळ) व तगरखेडा (ता. निलंगा) येथे ठिकाणी बल्ब उत्पादनाचा पथदर्शी प्रकल्पाची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीनेही हातभार लावला असून पंधरा लाखांचा निधी मंजूर केला आहे.

अनेक वर्षांपासून महिला बचतगटाची चळवळ सुरू आहे. या चळवळीतून महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देऊन सक्षम करण्याचे प्रयत्न झाले. चळवळीतून अनेक महिला विविध व्यवसाय व उद्योगांतून स्वावलंबी होऊन स्वतःच्या पायावर उभारल्या. बचतगटाच्या महिलांना पापड, शेवया तयार करण्यासह शेळीपालन आदी पारंपरिक व्यवसायाची गोडी लागली आहे. या व्यवसायातून भरीव उत्पन्न मिळत नसतानाही तेच ते व्यवसाय केले जात होते. व्यवसायाची ही परंपरा बदलण्यासाठी जीवन्नोनती अभियानातून प्रयत्न होत आहेत. यामुळेच बचतगटांच्या महिलांनी पारंपरिक व्यवसाय सोडून नव्या व आधुनिक व्यवसायाकडे वाटचाल सुरू केली आहे. महिला आता पुरुषांच्या बरोबरीने नवनवीन व्यवसाय करताना दिसत आहेत.

ही चळवळ सुरू असतानाच एलईडी बल्बच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याची कल्पना पुढे आली. त्यासाठी महिलांना प्रशिक्षण देण्याची गरज होती. वर्धा येथील महिलांकडून महिलांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणानंतर काही दिवसांतच महिलांनी बल्ब तयार करून त्याची विक्रीही सुरू केली. यामुळे महिलांच्या या व्यवसायाला व्यापक स्वरूप देऊन त्यातून अन्य महिलांना प्रेरणा देण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल पथदर्शी प्रकल्पाची संकल्पना मांडली. त्यांची ही संकल्पना पालकमंत्री अमित देशमुख यांनी उचलून धरत प्रकल्पासाठी निधी देण्याची तयारी दाखवली. यातूनच अजनी व तगरखेडा येथे एलईडी बल्ब उत्पादनाचे दोन पथदर्शी प्रकल्पासाठी नियोजन समितीतून प्रत्येकी सात लाख ३६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती अभियानाचे जिल्हा अभियान व्यवस्थापक देवुकमार कांबळे यांनी दिली.

कच्चा माल आणि शेड
नियोजन समितीच्या निधीतून दोन्ही पथदर्शी प्रकल्पात एलईडी बल्ब तयार करण्यासाठीचा कच्चा माल व छोटे शेड तयार करण्याचे नियोजन आहे. दोन्ही प्रकल्पातून बचतगट व ग्रामसंघाच्या साठ महिलांना रोजगार मिळणार आहे. प्रकल्पातून बचतगटाच्या महिलांना प्रशिक्षणही देण्याचे नियोजन आहे. यानंतर बँकेकडून अर्थसाह्य घेऊन विविध ठिकाणी बचतगट व ग्रामसंघाकडून एलईडी बल्ब तयार करण्याचे युनिट सुरू करण्यात येणार आहेत. दोन्ही पथदर्शी प्रकल्प तीन महिन्यांत कार्यान्वित होण्याची शक्यता श्री. कांबळे यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur ZP School: सोलापूर जिल्हा परिषद शाळांमध्ये ९५७ शाळांची पटसंख्या वाढली, ५,३९७ नवीन विद्यार्थी

Pakistan: कोणालाच विश्वास बसणार नाही! फाळणीनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात असं घडलं… इतिहास बदलणारा निर्णय?

Latest Marathi News Live Update: अन्न व पुरवठा विभातील लाचखोर अधिकारी, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

Lord Jagannath: भगवान जगन्नाथाला इंग्रज का घाबरायचे? दोन अधिकाऱ्यांना बसला होता मोठा धक्का

Nashik Pune Railway : नाशिक-पुणे रेल्वे संगमनेर मार्गेच करा! शिवनेरीचे ऐतिहासिक महत्त्व वाढणार; आमदार सत्यजित तांबे यांची अधिवेशनात आग्रही मागणी

SCROLL FOR NEXT