फोटो 
मराठवाडा

आश्‍चर्यम्...! म्हैशीला जन्मला दोन तोंडासह विचित्र रेडकुस

गंगाधर डांगे

मुदखेड (जिल्हा नांदेड) : सरेगाव (ता. मुदखेड) येथील एका शेतकऱ्याच्या घरी त्यांच्या म्हैशीच्या पोटी बुधवारी (ता. ११) एक विचित्र प्राण्याने जन्म घेतला आहे. हे जन्मलेले रेडकुस म्हणजे पंच क्रोशीतील लोकांच कुतुहल बनल आहे.

या विषयी मिळालेली सविस्तर माहीती अशी की, सरेगाव (ता. मुदखेड) येथिल शेतकरी माधव सखाराम गिरे पाटील हे शेती बरोबर शेती पुरक जोडधंदा म्हणुन दुधाचा व्यवसाय करतात त्यांच्याकडे गायी, म्हैशी मोठ्या प्रमाणावर आहेत. शेतकरी माधव गिरे पाटील यांनी चार महिण्यापुर्वी मुदखेडच्या बाजारातुन गाभन असलेली एक म्हैस खरेदी केली होती. त्या म्हैशीचे संगोपन त्यांनी व त्यांच्या परिवारातील सदस्यांनी घरातील सदस्याप्रमाणे केली.

रेड्यास जन्मतः दोन तोंड आत, तिन शेपटी, सहा पाय

या म्हशीने बुधवारी (ता.११) रोजी दुपारी चार वाजता माधव गिरे यांच्या रहात्या घरच्या गोठ्यामध्ये एका रेडकुला जन्म दिला. जन्मलेले पिलु हे विचित्रच आवस्थेत जन्मले हे पाहुन कुटुंबासह सर्वांना एक आश्चर्याचा मोठा धक्काच बसला. या म्हशीने जन्म दिलेले रेडकु हे मोठे आश्चर्य जनक आहे. हे वासरू म्हणजे ग्रामीण भाषेत हाल्या ( रेडकुस) आहे. या रेड्यास जन्मतः दोन तोंड आत, तिन शेपटी, सहा पाय आहेत या रेडकुसाची लांबी साडेपाच फुट तर उंची तिन फुट आहे. सध्या तो जीवंत आहे. 

पहिल्यांदाच असे विक्रृत रेडकु

माधव गिरे पाटील यांची म्हैस त्यांच्या घरी चौथ्यांदा जनली (इली) आहे. पुर्वीच्या मालकाच्या घरी तिन वेळा इली आहे. पुर्वीचे कालवड व रेडा चांगले जन्मले हे पहिल्यांदाच असे विक्रृत रेडकु जन्मल्याचे त्यांचेकडुन सांगण्यात आले. आमच्या गावात एखाद्या पाळीव दुभत्या प्राण्यांच्या पोटी असे विचित्र वासरू जन्माला येण्याची पहिलीच वेळ असल्याचे सरेगावचे सधन तथा दुध उत्पादक शेतकरी साईनाथ मस्के यांनी ‘सकाळ'शी बोलताना सांगितले.

पशुधन विकास अधिकारी श्री. पवार यांनी सांगितले.

पशु प्राण्यांच्या वासारतील आनुवंशिक व्यंगप्रकाराची कारणे निश्चित नसतात. गर्भ धारणाच्या सुरवातीच्या काही आठवड्यात आनुवंशिक दोषामुळे अश्‍या प्रकारचे व्यंग उद्भवतात. सदरील दोषाचे वैज्ञानिक नाव डायसिफालस टेट्रापस टेट्राब्रकिअस ट्राईकौडातस ईसचीओगास (dicephalus tetrapus tetrabrachius tricaudatus ischiophagus) अशी नावे आहे. असे या बद्दल सिंधी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी श्री. पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT