आखाडा बाळापूर वाळू पट्टा 
मराठवाडा

आखाडा बाळापूर परिसरात वाळू लिलावातून मजुरांना मिळाला रोजगार

आखाडा बाळापुरपासून जवळ असलेल्या सापळी, डोंगरगाव पूल येथून वाहणाऱ्या कयाधू नदीवरील वाळू पट्ट्याचे लिलाव मार्च महिन्यात कोट्यवधी रुपयांना कंत्राटदारांना देण्यात आलेला आहे.

सय्यद अतीक

आखाडा बाळापूर ( जिल्हा हिंगोली ) : शासनाने लिलाव केलेल्या वाळू पट्ट्यातून महसूल विभागाला कोट्यावधी रुपयाचा महसूल मिळल्या बरोबरच परिसरातील हातावर पोट असणाऱ्या अनेक मजुरांना चांगला रोजगार मिळवून त्यात त्यांच उदरनिरवाह सुरु आहे. तसेच बांधकाम साहित्यही मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने सर्वांनाच आर्थिक फायदा झाल्याचे वाळू पट्ट्याच्या वाहतूकीवरुन दिसत आहे.

आखाडा बाळापुरपासून जवळ असलेल्या सापळी, डोंगरगाव पूल येथून वाहणाऱ्या कयाधू नदीवरील वाळू पट्ट्याचे लिलाव मार्च महिन्यात कोट्यवधी रुपयांना कंत्राटदारांना देण्यात आलेला आहे. या वाळू पट्ट्याच्या लिलावातून शासनाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळण्याबरोबरच परिसरातील हातावर पोट असणाऱ्या शेकडो मजुरांना रोजगार मिळून त्यात त्यांचा चांगला उदरनिर्वाह झालेला आहे.

हेही वाचा - संभावनाच्या बाबांचं कोरोनाने झालं निधन

आखाडा बाळापूरपासून जवळ असलेल्या सापळी, डोंगरगाव पूल, धावडा येथील वाळू पट्ट्याची लिलाव मागील दोन ते अडीच वर्षापासून झाले नसल्याने व वाळू मिळत नसल्याने अनेक शासकीय, खाजगी कामे बंद पडली होती परिणामी बांधकाम करणारे मिस्तरी व मजूरांवर उपासमारीची वेळ आली होती. बांधकामाला लागणारे साहित्य विकणाऱ्या दुकानदाराची ही साहित्य विकत नसल्याने मोठे नुकसान होऊन लोखंड सिमेंट महिनोनमहिने जागेवर पडत पडून राहत होते.

व्यापारी वर्गाने मोठे नुकसान होत होतं. यावर्षी मार्चअखेर राज्य शासनाने वाळू पाट्याचा लिलाव जाहीर केल्याने येथील कंत्राटदाराने तो कोट्यवधी रुपयांना वाळू पट्टा विकत घेऊन त्या वाळू पट्ट्यावर ट्रॅक्टरद्वारे वाळूचा उपसा सुरु केला होता. वाळू वाहनात भरण्यासाठी परिसरातील शेकडो मजुरांना कामे लागले होते या कामातून त्यांना चांगलाच रोजगार मिळून मागील दोन महिने कोरोना आजाराच्या काळात कडक संचारबंदीत असताना ही मजुरांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवून त्यांचा उदरनिर्वाह झाल्याचे अनेक मजूरवर्ग सांगताहेत. आखाडा बाळापूर व परिसरात अनेक मध्यमवर्गीयाना कमी दरात वाळू मिळत असल्याने बांधकामे उरकुन घेतल्याचेही अनेक ठिकाणी दिसून आले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Alert : पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरुच, सिंहगडावर दरड कोसळली; पर्यटकांना सतर्कतेच्या सूचना

Latest Marathi News Live Update : शिंगणापूर बंधाऱ्यावर पोलीस बंदोबस्त, धोकादायक वाहतुकीला प्रशासनाचा अटकाव

Cristiano Ronaldo निवृत्त होतोय? बहिणीच्या दाव्याने खळबळ, पोर्तुगालच्या सुपरस्टारनेही त्यावर दिली प्रतिक्रिया; म्हणाला, मी आता...

UNESCO Kas Plateau : कास पठारावर अवतरला जागतिक स्तरावर दुर्मीळ असलेला 'सातारी तुरा'; समुद्रसपाटीपासून 1000 मीटर उंचीवर उगवणारी 'ही' वनस्पती नेमकी आहे तरी काय?

Sankashti Chaturthi 2026: संकष्टीचा उपवास करताय ? चुकूनही खाऊ नका 'हे' ५ पदार्थ...

SCROLL FOR NEXT