parali karkhana 
मराठवाडा

पंकजा मुंडेंच्या कारखान्यातील कामगार 18 महिने पगारीविना; कामगार संपावर

सकाळवृत्तसेवा

परळी वैजनाथ (बीड): तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी मागील १८ महिन्यांपासून कारखान्याने पगार न दिल्याने बुधवारी (ता.१०) कारखाना बंद केला असून जोपर्यंत पगार नाही तोपर्यंत कारखाना सुरू करणार नसल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. या कारखान्याच्या विद्यमान अध्यक्षा भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आहेत.

पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी दहा दिवसांपूर्वी कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. दिक्षतलू यांना निवेदन दिले होते. या कर्मचाऱ्यांना गेल्या १८ महिन्यांपासून पगार थकीत आहे. थकीत पगार १० दिवसांत आमच्या खात्यात वर्ग करा अन्यथा आम्ही कारखाना बंद करु असा इशारा देण्यात आला होता. दहा दिवस होऊनही पगार न झाल्याने कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळ पासूनच कारखाना बंद केला असून यात वजन काटा व सर्व कार्यालयाचे कर्मचारी, उत्पादन युनिटचे कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.

या संपाबदल कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. कारण पंकजा मुंडे यांनी अनेक अडचणीतून हा कारखाना यंदा सुरू केला, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळालाही होता. मात्र कर्मचाऱ्यांचे पगार मात्र थकीत आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांनी हे संपाचे हत्यार उपसले आहे. दरम्यान वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी अत्यंत मेहनतीने उभा केला. या कारखान्याने उत्पादनाचे अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत.

यामुळे हा कारखान्याचे नाव आशियाखंडात झाले होते. अशा कारखान्यासमोर गेल्या काही वर्षापासून अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. या अगोदर दोन वर्षांपूर्वी कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी पगारासाठी आंदोलन केले होते. त्यावेळी याची चर्चा राज्यभर झाली होती. यावेळी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या.कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे यांनी विरोधकावर शरसंधान केले होते. जिल्हा बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठीही विरोधकांनी अनेक अडचणी निर्माण केल्या होत्या. पण पंकजा मुंडे यांनी यातून मार्ग काढत कारखाना सुरू केला. पण पुन्हा कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनासाठी कारखाना बंद केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT