file photo 
मराठवाडा

कुस्तीच्या फडात रंगला चोरट्यांचा आखाडा 

नवनाथ येवले

नांदेड, यात्रा म्हटल की, हौशा-नवशांच उत्साह आलाच बऱ्याच वेळा उत्साहीपना अती ठरतो. याचा प्रत्यय माळेगाव यात्रेत कुस्तीच्या फडात आला. त्याच झालं असे की, कुस्त्यांचे उद्घाटन झाल्या नंतर कार्यक्रमस्थळाकडे जात असताना एक खासदार, दोन आमदार सोबत सुरक्षा गार्ड आणि पोलिसांचे सुरक्षा कवच असताना कार्यक्रमाच्या अध्यक्षाच्या पॉकीटवरच चोरट्यांनी हात साफ केला. कुस्तीच्या फडात मल्लांची सलामी घेण्यासाठी गेलेले जिल्हापरिषद उपाध्यक्ष समाधान जाधव यांना पोलिसांचे सुरक्षा कवच भेदून चोरट्यांनी पंचवीस हजार रुपयांची अगळीवेगळी सलामी दिली. 

जिल्हापरिषदेच्या नियोजीत कार्यक्रमानुसार पंचायत समिती, लोहा अंतर्गत माळेगाव यात्रास्थळी गुरुवारी कुस्त्यांची दंगल आयोजीत करण्यात आली होती. राज्यासह परप्रांतामधून दाखल झालेल्या मल्लांचे डावपेच टिपण्यासाठी सकाळपासूनच कुस्ती प्रेमींनी फडाभोवती रिंगण धरले होते. नियोजीत वेळेनुसार दुपारी २:०० च्या दरम्यान जिल्हापरिषद उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्या अध्यक्षतेखाली खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार श्यामसुंदर शिंदे, माधवराव जवळगांवकर पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, शिक्षण व आरोग्य सभापती माधवराव मिसाळे, लोहा पंचायत समितीचे सभापती सतिष उमरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. 

उत्साही कार्यकर्त्यांचा गराडा
जिल्ह्याचे खासदार, दोन आमदार आणि जिल्हापरिषदेचे पदाधिकारी अशा राजकीय नेतृत्वाचा मिलाप झाल्यामुळे विविध कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाभोवती गराडा घातला. यामध्ये पदाधिकाऱ्यांचे सुरक्षागार्ड, नियुक्त पोलिस कर्मचारी कार्यकर्त्यांच्या भाऊगर्दीत हरपुन गेले. उद्घाटन सुरु असतानाच अतिउत्साही कार्यकर्त्यांनी घोषणाबजी केल्याने गोंधळ निर्माण झाला. गोंधळ निर्माण झाल्याने पोलिस, सुरक्षा गार्ड घटनास्थळाकडे धावले पण पूर्वीपासून कार्यकर्त्याच्या गराड्यात सावजाच्या शोधात असलेल्या चोरट्यांनी काम फत्ते करुनच रिंगण सोडले. 

गर्दीत चोरट्यांची चालाखी 
आयोजीत कार्यक्रमाचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव यांनी रक्कम मोठी असल्याने बॅक पॉकीट ऐवजी पॅन्टच्या समोरील पॉकीटमध्ये पंचवीस हजार ठेवले होते. दरम्यान उद्घाटनावरुन खासदार , एका आमदारांच्या कार्यकर्त्यात गोंधळ निर्माण झाल्याने कार्यकर्त्यांना सावरण्यात मग्न उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्या बॅक पॉकिटमधल्या पॉकीटला धक्का न लावता चोरट्यांनी त्यांच्या समोरीच्या पॉकिटमधील पंचवीस हजार रुपयांच्या रोकडवर अलगत हात साफ केला. त्याच वेळी अन्य एका कार्यकर्त्याने त्या चोरट्यास पकडण्याचा प्रयत्न केला पण काही कळण्याच्या आत घटनास्थळावरुन चालाखीने पसार होण्यात तो चोरटा यशस्वी झाला. 

येथे क्लिक करुन पहा ..रेल्वे चोरट्यास पोलिस कोठडी

चोरट्यांनी सुरक्षा कवच भेदलेच कसे
घटनास्थळी खासदार, दोन आमदार यांच्या सुरक्षागार्डसह यात्रेनिमीत्त तैनातीत असलेल्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे सुरक्षा कवच होते. कार्यकर्त्यांध्ये गोंधळ निर्माण झाल्या नंतर तात्काळ पोलिस कर्मचारी कार्यक्रमस्थळाकडे धावले पण तोपर्यंत चोरटे तो पर्यंत काम फत्य करुन पसार होण्यात यशस्वी झाले. प्रत्यक्षात प्रशासनाच्या नियोजीत कार्यक्रमासाठी निमंत्रीत लोकप्रतीनिधी, पदाधिकारी चोरट्यांच्या तावडीतून सुटत नसतील तर यात्रेमध्ये सामांन्याच काय असा प्रश्न निर्माण होत असला तरी पोलिसांचे सुरक्षा कवच चोरट्यांनी भेदलेच कसे हा प्रश्न त्याही पेक्षा अधिक चिंतेचा आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NPS गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! एक्झिट नियमांत बदल; PFRDA चा मोठा निर्णय, नवे नियम काय?

Gen Z Workplace Trends 2025: ‘जॉब हगिंग’पासून ‘कॉन्शस अनबॉसिंग’पर्यंत; 2025 मध्ये Gen Z ने अशी बदलली करिअरची व्याख्या

Year-Ender 2025 : क्रॅश ते कमबॅक! 2025 मधील शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची झोप उडविणारे टॉप 10 चढ-उतार

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये एसटी बसला आग लागल्याची घटना

2025 मध्ये ट्रेकिंगचं चित्र बदललं! भारतातील ‘या’ 5 नव्या ट्रेक्सनी थराराची उंची गाठली

SCROLL FOR NEXT