file photo 
मराठवाडा

शेतकऱ्यांसाठी परभणीच्या पालकमंत्र्यानी दिल्या ‘या’ सूचना

सकाळ वृत्तसेवा

परभणी : परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्यांक विकास व कौशल्य विकास व उद्योजकता तथा परभणीचे पालकमंत्री नवाब मलीक यांनी खरीप हंगाम २०२० पूर्वतयारीची आढावा बैठक गुरुवार (ता.३०) घेतली. यावेळी त्यांनी संबंधीत यंत्रणेस खते, बियाणे शेतकऱ्यांना वेळेवर उपलब्ध करून द्यावीत. तसेच महावितरणच्या ट्रान्सफार्मरबाबत बऱ्याच तक्रारी असून या तक्रारींची तत्काळ सोडवणूक करावी अशा सूचना दिल्या.

परभणी येथील खरीप हंगाम २०२० पूर्व आढावा बैठकीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलीक यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी बैठक घेण्यात आली. या बैठकीस खासदार संजय जाधव, आमदार सुरेश वरपूडकर, आमदार डॉ.राहूल पाटील, आमदार मेघना बोर्डीकर साकोरे, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी. पी., पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, महापालिका आयुक्त रमेश पवार यांच्यासह प्रशासनातील सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थिती होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षीत ठेवून तसेच तोंडाला मास्क बांधून या आढावा बैठकीत सर्वांनी हजेरी लावली.

खरीप पिककर्ज वाटपा संदर्भात मेळावे घ्या
यावेळी पालकमंत्री नवाब मलीक यांनी खरीप हंंगाम २०१९-२० मध्ये शेतकऱ्यांच्या मागणीनुसार खते व बियाणांचा पुरवठा करण्यात यावा. बियाणे व खतांचा तुटवडा होणार नाही याची सर्वांनी दखल घ्यावी. अनुदानावर वाटप करण्यात येणाऱ्या बियाणे योग्य शेतकरी व लाभार्थ्यांना कसा लाभ होईल, याची काळजी घ्यावी असे सूचविले. तसेच जिल्हा अग्रणी बँकेने पुढाकार घेऊन खरीप पिककर्ज वाटपा संदर्भात जास्तीत जास्त ठिकाणी मेळावे घ्यावेत. तसेच वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून याची प्रसिद्धी करावी. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत या योजनांचा लाभ देण्यात यावा. खासदार संजय जाधव, आमदार डॉ.राहूल पाटील यांनीही पालकमंत्र्यांकडे शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर तसेच कोरोनाच्या उपाययोजना संदर्भात सूचना केल्या.


काळ्या यादीत टाकण्याच्या सूचनाही
पालकमंत्र्यांनी महावितरणच्या तक्रारीबाबत गांभीर्याने दखल घेत शेतकऱ्यांचे ट्रान्सफार्मर जळण्याचे मोठे प्रमाण आहे. संबंधीत ठेकेदार वेळेवर काम करीत नसतील तर शेतकऱ्यांना अडचणीस सामोरे जावे लागेल. यामुळे संबंधीत ठेकेदार कामात कसूर करीत असतील तर त्यांना काळ्या यादीत टाकण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे, महावितरणचे अभियंता जायभाये आदींची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Latest Maharashtra News Updates : आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला टोला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT