Yeldari Dam sakal
मराठवाडा

Yeldari Dam : येलदरी धरणाचे दोन दरवाजे उघडले : विद्युत निर्मितीसह ६८०२ क्युसेक्स विसर्ग सुरू

Yeldari Dam : येलदरी धरणाच्या दोन दरवाज्यांमधून ६८२० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जलविद्युत केंद्राद्वारे २६०० क्युसेक्स आणि धरणाच्या दरवाज्यातून ४२२० क्युसेक्स विसर्ग होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

राहाभाऊ नगरकर

जिंतूर : तालुक्यातील येलदरी धरणातून सोमवारी (ता.१४) दुपारी साडेबाराच्या सुमारास दोन दरवाजे उघडू त्याद्वारे ४२२० क्युसेक्स आणि जलविद्युत केंद्राद्वारेचा २६०० क्युसेक्स असा एकूण ६८२० क्युसेक्स विसर्ग सध्या पूर्णा नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे.

धरणाच्या उर्ध्व भागातील खडकपूर्णा धरणातून दोन दिवसांपासून नदीपात्रात

मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत असल्याने येलदरी धरणाच्या जलाशयाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. परिणामी शनिवारी (ता.१२) येथील जलविद्युत निर्मिती केंद्रामधील दोन विद्युत जनित्र कार्यान्वित करण्यात येऊन त्याद्वारे २६०० क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

परंतु जलाशयात पाण्याची आवक वाढतच असल्याने पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता (वसमत) कार्यालयाने धरणाचे दोन दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार येलदरी येथील उप अभियंता तथा पूर नियंत्रण कक्षातर्फे सोमवारी दुपारी दहापैकी क्रमांक एक व दोनचे दरवाजे प्रत्येकी अर्धा मीटरने उघडून त्याद्वारे ४२२० क्युसेक्स विसर्ग सोडला. याप्रमाणे सद्यस्थितीत एकूण ६८२० क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

दरम्यान, धरणात होत असलेली पाण्याची आवक पाहता विसर्ग कमी किंवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. यास्तव नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्यासंदर्भात येलदरी धरण पूर नियंत्रण कक्षातर्फे सुचित करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawrence Bishnoi gang threat : खळबळजनक! महाराष्ट्रातील काँग्रेस आमदाराला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी

गौतम गंभीरनं भारतीय क्रिकेटचं वाटोळं केलं, त्याने संघात राजकारण आणले...! खळबळजनक दाव्याने सारे चक्रावले

Panvel: पनवेलकरांसाठी मोठा निर्णय! सिडको वसाहत आणि २९ गावांना जोडणारी महापालिकेची बससेवा सुरू होणार; बसमार्ग आणि थांबे कसे ठरणार?

Latest Marathi News Live Update : आदित्य पंचोली विरोधात दाखल अत्याचार प्रकरणातील FIR रद्द करण्यासाठी 28व्यांदा सुनावणी

Raksha Khadse : "आमदारांच्या मुलींच्या हस्ते उद्घाटनं उरकताय का?" रक्षा खडसेंनी 'महावितरण'ला झापले

SCROLL FOR NEXT