Electricity generation esakal
मराठवाडा

Jintur News : येलदरी जलविद्युत केंद्रातून पंधरा दिवसांत चार कोटी वीस लाख रुपयांची विजनिर्मिती

जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील जलविद्युत केंद्रातून वीजनिर्मितीद्वारे पंधरा दिवसात एक कोटी रुपयांची वीज निर्मिती करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

जिंतूर - तालुक्यातील येलदरी येथील जलविद्युत केंद्रातून वीजनिर्मितीद्वारे पंधरा दिवसात एक कोटी रुपयांची वीज निर्मिती करण्यात आली. यामुळे शासनाच्या तिजोरीमध्ये एक कोटी रुपयाची भर पडली.

येलदरी धरणालगत असलेल्या या जलविद्युत केंद्राद्वारे धरणातील पाण्यावर वीजनिर्मिती केली जाते.पंधरा दिवसापूर्वी म्हणजे तीन एप्रिल रोजी धरणातून लाभ क्षेत्रातील उन्हाळी हंगामातील पिकांसाठी जलविद्युत केंद्राद्वारे नदीपात्रात दुसरे आवर्तन सोडण्यात आले. ते बुधवारी (ता. १७) थांबवण्यात आले.

त्यामुळे वीजनिर्मिती बंद करण्यात आली. या पंधरा दिवसांच्या कालावधीत केंद्रातील संचाद्वारे ४२ लाख २९ हजार युनिट वीज निर्मिती करण्यात आली. ज्याचे आजचे बाजारमूल्य सुमारे चार कोटी वीस लाख रुपये आहे.

त्यासाठी कार्यकारी अभियंता उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता जांबुतकर यांच्यासह अनिल वाघ, अण्णामवार, आळसे, गौरव कापकर, अमोल शिवकर, निलेश कानडे, हिंमत काळे, रमेश भंडारी, आदित्य पाठे, कैलास माकोडे, श्रीकांत बोराळकर, अमिन शहा आदींनी प्रयत्न केले. सध्या धरणात तीस टक्केच पाणीसाठा उपलब्ध असल्याने तो राखीव ठेवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT