येलदरी धरण
येलदरी धरण 
मराठवाडा

‘येलदरी’ शंभर टक्के भरले हो...

कैलास चव्हाण

परभणी : परभणीसह हिंगोली, नांदेड जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या जिंतूर तालुक्यातील येलदरी धरण बुधवारी (ता.२०) शंभर टक्के भरले आहे. धरणाच्या ५० वर्षाच्या इतिहासात शंभर टक्के भरण्याचे यंदाचे सोळावे वर्ष आहे. दरम्यान, धरण भरल्याने विज निर्मितीचे सर्व संच सुरु करुन त्या द्वारे पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे पुरस्थिती निर्माण होण्याचा धोका टळला आहे.

यंदा २० सप्टेंबरपर्यंत मृतसाठ्यात असलेल्या येलदरी धरणात बुलढाणा जिल्ह्यातून खडकपूर्णा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने ता.२१ सप्टेंबर रोजी धरण मृतसाठ्यातून बाहेर आले होते. तेव्हांपासून धरणात वरच्या भागातून अावक सुरु राहिली. त्यात ऑक्टोबर महिण्यात सलग अतिवृष्टी सुरु झाल्याने खडकपूर्णा दुसऱ्यांदा भरले. त्यामुळे त्या धरणाचे सर्व दरवाजे काही दिवस उघडण्यात येऊन पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु राहिल्याने येलदरी धरणाची पाणी पातळी ५० टक्याच्या पुढे गेली.  पुढे काही दिवस अावक सुरु राहिल्याने धरण ७० टक्के आणि नोव्हेंबर महिण्याच्या सुरवातीला ९० टक्यावर गेले. त्यामुळे धरणावरील विजनिर्मिती संच सुरु करुन पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला. आतापर्यंत १२ दिवसात एक कोटी ७२ लाख रुपयाची विजनिर्मिती झाली आहे.

डोंगरपट्यातून पाण्याची अावक 
अतिवृष्टीमुळे बुलढाणा आणि औरंगाबाद जिल्ह्यातील डोंगरपट्यात नदी-नाले भरले आहेत. काही ठिकाणी पाझरे सुरु झाले आहेत. त्यामुळे पाऊस थांबल्यानंतरही नदीपात्रात डोंगरपट्यातून पाण्याची अावक सुरु राहिली आहे. मागील दिवस संथगतीने पाण्याचा प्रवाह असला तरी आवक सुरु असल्याने दररोज पाणीसाठा वाढत चालला आहे. मागील काही दिवसांपासून संथगतीने पूर्णा नदीपात्रात पाणी येत आहे. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत धरण शंभर टक्के भरले आहे. धरणाची एकुण पाणीपातळी ४६१.७७२ मिटर असून एकुण पाणीसाठा ९३३.९४० दलघमी (३३.०७ टिएमसी) एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. यात जिवंत पाणीसाठा ८०९.२६३ दलघमी आहे. मागील २४ तासात २.५४२ दलघमी पावसाची आवक झाली आहे. तर विज निर्मिती केंद्रातून १.१९० दलघमी (४५८ क्युसेने) पाण्याचा विसर्ग सुरु आहे.


५७ हजार हेक्टरवरील क्षेत्राला लाभ
या धरणाचा लाभ हिंगोली जिल्ह्यातील २२ हजार ६५८ हेक्‍टर, परभणी जिल्‍ह्यातील १६ हजार १४२ हेक्‍टर व नांदेड जिल्‍ह्यातील १९ हजार १८८ हेक्‍टर अशा ५७ हजार ९८८ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. तर जिंतूर, परभणी, पूर्णा, वसमत, नांदेड या शहरासह २०० हून गावांचा पाणीप्रश्न सुटला आहे.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT