Yogi shyam bharati did not file his nomination for loksabha elelction after call from nitin gadkaris office
Yogi shyam bharati did not file his nomination for loksabha elelction after call from nitin gadkaris office 
मराठवाडा

Loksabha 2019 : गडकरींच्या कार्यालयातील दुरध्वनीने योगींची माघार

मंगेश शेवाळकर

लोकसभा 2019 
हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी करणाऱ्या माहूर येथील योगी शाम भारती महाराज यांना केंद्रीयमंत्री नितीन गडकरींच्या कार्यालयातून आलेल्या दुरध्वनीनंतर योगींनी माघार घेतली आहे. 

हिंगोली लोकसभा मतदार संघातून भाजपा कडून माहूर येथील योगी शाम भारती महाराज यांनी निवडणुक लढविण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. त्यासाठी त्यांनी हिंगोली लोकसभा मतदार संघातून गावांमधून मागील एक वर्षापासून संपर्क देखील वाढविला होता. नांदेड, यवतमाळ येथील विधानसभा मतदार संघातून मतदारांच्या गाठीभेटीनंतर त्यांनी हिंगोली, वसमत व सेनगाव विधानसभा मतदार संघात भेटी देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता.

दरम्यान, योगी शाम भारती महाराज यांच्या शिष्यांनीही त्यांना उमेदवारी दाखल करण्याची गळ घातली होती. त्यामुळे त्यांनी अपक्ष म्हणून 
उमेदवारी दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर सोमवारी (ता. 25) रात्री उशीरा पर्यंत त्यांच्या समवेत शिष्यांच्या बै ठकाही झाल्या होत्या. मात्र रात्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून दुरध्वनी आल्यानंतर योगी शाम भारती महाराज यांनी त्यांचा निर्णय बदलून उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचे ठरविले.

या संदर्भात योगी शाम भारती महाराज यांनीही दुजोरा दिला असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कार्यालयातून दुरध्वनी आला होता. याशिवाय भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनीही युती असल्यामुळे युतीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहण्याचे कळविल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याणमधून ठाकरे उमेदवार बदलणार? आणखी एक अर्ज दाखल झाल्यानं चर्चेला उधाण

Latest Marathi News Live Update : दक्षिण मुंबईतून शिवसेनेच्या यामिनी जाधव यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल

Aranmanai 4 Twitter Review: कुणी म्हणालं, 'ब्लॉकबस्टर' तर कुणी म्हणालं, 'जबरदस्त VFX'; तमन्नाच्या 'अरनमनई 4'नं जिंकली नेटकऱ्यांची मनं

Naach Ga Ghuma Review: 'ती' देखील वर्किंग वूमनच...? हास्य आणि भावनिक क्षणांची रोलर कोस्टर राईड

IND vs PAK T20 World Cup 24 : सामना भारत - पाकिस्तानचा फायदा न्यूयॉर्कच्या हॉटेल्सचा! तब्बल 600 टक्क्यांनी वाढलं रूम्सचं भाडं

SCROLL FOR NEXT