Osmanabad Osmanabad
मराठवाडा

'शासनाने दखल घ्यावी...' आत्महत्येपूर्वी केलेल्या व्हिडिओत शेतकऱ्याने केली होती विनंती

मंगळवारी हैदराबाद येथे उपचार सुरू असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे

वैभव पाटील

मंगळवारी त्यांच्यावर हैदराबाद येथे उपचार सुरू असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे

निपाणी (उस्मानाबाद): येथील शेतकरी अशोक राजेंद्र गुंड (वय २९) यांनी (ता. २०) विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मंगळवारी (ता.२३) त्यांच्यावर हैदराबाद येथे उपचार सुरू असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अशोक गुंड हे सोयाबीन पिकाच्या नापिकीने हवालदिल झाले होते. विषप्राशन करण्यापूर्वी त्यांनी व्हिडिओ करून तो सोशल मेडियावर अपलोड केला होता. गुंड यांनी या व्हिडिओमध्ये प्रशासनाला विनंती केली होती. त्यामध्ये, शासनाने सोयाबीनचे पंचनामे करून पाहणी करावी. पाडोळी, शिराढोण, निपाणी शिवारातील पिके पावसाअभावी धुरळा (करपून) होऊन गेली आहेत. या पिकात जनावरे सोडण्याची पाळी शेतकऱ्यांना आली आहे. गेल्या २५ दिवसांपासून पाऊसासोबत लाईट नाही, याची प्रशासनाने लवकर दखल घ्यावी अशी विनंती केली होती.

स्वतःचा सोयाबीन उपटून टाकला असून, या प्लॉटमध्ये काहीही राहिले नाही असेही गुंड या व्हिडिओत म्हणताना दिसत आहेत. आता शेतकऱ्यांवर सोयाबीनमुळे उपासमारीची वेळ आली असून याकडे विमा कंपनी व शासनाने लक्ष देऊन पंचनाम्याची करण्याची गरज असल्याचेही त्यांनी व्हिडिओमध्ये मत मांडले होते. हा व्हिडिओ व्हायरल करूनही प्रशासनाला जाग आली नाही. अखेर या नैराश्यातून त्यांनी विषप्राशन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT