Coriander Plantation esakal
मराठवाडा

कोथिंबिरीने दिली दिवाळीचे अनोखी भेट, महिन्यात दीड लाखांचे उत्पन्न

दोनदा अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिक नष्ट झाले. त्यामुळे खचुन न जाता वेळीच निर्णय घेत कोथींबीर लागवड तरुण शेतकऱ्याने केली.

अनिल जोशी

झरी (जि.परभणी) : दोनदा अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिक नष्ट झाले. त्यामुळे खचुन न जाता वेळीच निर्णय घेत कोथींबीर (Coriander Plantation) लागवड करुन जेवढे सोयाबीन पिकातून उत्पन्न मिळणार होते. त्यापेक्षा अधिक पटीने उत्पन्न काढत एक प्रकारे निसर्गाशी दोन हात करत अन्य शेतकऱ्यांना प्रेरणा देणारी यशोगाथा आहे झरी (ता.परभणी) (Parbhani) येथील अल्पभूधारक शेतकरी सचिन उत्तमराव पवार यांची. झरी येथील अल्पभूधारक शेतकरी सचिन यांनी जुन महिन्याच्या अखेरीस सोयाबीन व तुर पिकाची पेरणी केली होती. परंतु सात जुलैच्या ढगफुटीमुळे त्यांचे सोयाबीन पूर्ण वाहुन गेले. त्यामुळे त्यांनी जुलै अखेरीस पुन्हा सोयाबीन पेरले. परंतु कोपलेला निसर्ग त्यांची पाठ सोडत नव्हता. 11 सप्टेंबर रोजीच्या त्या अतिवृष्टीत वाढीस लागलेले सोयाबीन जमिनीसह खरडुन गेले. दोन वेळचा पेरणी खर्च वाया गेला. शिवाय आगामी वर्षभराचे आर्थिक गणित बिघडले. परंतु त्यांनी हताश न होता काहीतरी वेगळ करण्याचा प्रयत्न सुरु केला. दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात भाजीपाल्याचे दर वाढलेले असतात.

त्यात कोथींबीर तर 150 ते 200 रुपये किलोने विकली जाते. त्यामुळे त्यांनी तुरीच्या पिकात दहा किलो धने किलो टाकून कोथिंबीर तयार केली. अवघ्या महिनाभरात कोथींबीर विक्रीस तयार झाली. एक आठवड्यापूर्वी त्यांनी कोथींबीर परभणीच्या भाजी मार्केटमध्ये नेली असता एक क्विंटल 25 किलो कोथिंबीर निघाली. बाजारात तेजी असल्यामुळे कोथिंबीर 15 हजाराचा भाव मिळाला. एका महिन्यात दहा किलो धने खर्च व फवारणी इंधन खर्च असा मिळून केवळ सात हजार रुपये खर्च झाला. सदरील शेतकऱ्यास दीड लाखाचे उत्पन्न झाले. अतिवृष्टीमुळे शेतकरी सोयाबीन तूर आदी पिके गेल्यामुळे हवालदार असताना अशातच युवा शेतकरी सचिन पवार यांनी कोथिंबिरीचा अनोखा प्रयोग करून झरी परिसरात चर्चा निर्माण केली आहे. गतवर्षी त्यांच्या वडिलांचे एका मोठ्या आजारामुळे निधन झाले. त्यामध्ये त्यांना औरंगाबाद या ठिकाणी मोठा खर्चही लागला होता. अशातच शेतकऱ्याने खचून न जाता आपल्या काही तरी केले पाहिजे या आशामधून कोथिंबिरीचा नवीन प्रयोग केला आणि तो यशस्वी ठरला.

वडिलांचे निधन झाल्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यात शेतीची संपुर्ण जबाबदारी खांद्यावर आली. त्यात अतिवृष्टीचे संकट. परंतु त्यातुन मार्ग काढत कोथींबीर प्रयोगातून भरघोस उत्पन्न मिळवले. शेतकऱ्यांनी नव-नवीन प्रयोग करून शेती करावी.

- सचिन पवार, युवा शेतकरी, झरी (ता.परभणी)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या, १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर

FDA Crime : पुणे शहरातील प्रसिद्ध गोल्‍डन बेकरीसह दहा बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; अस्वच्छतेप्रकरणी एफडीएची कारवाई

Garfield Sobers: क्रिकेटच्या इतिहासातील महान ऑलराउंडर काळाच्या पडद्याआड! गॅरी सोबर्स यांचं निधन; क्रीडाजगत शोकसागरात

Pune News : जप्त गुळाचे करायचे काय? गूळ उत्पादकांचा सवाल, जवळपास ४०० गुऱ्हाळांवर परिणाम

Amritsar Express: अमृतसर एक्स्प्रेसच्या डब्याखाली सापडला मानवी पाय; सीएसएमटी रेल्वे यार्डमधील घटना, रेल्वे पोलिसांना वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT