Ramesh Phule sakal
मराठवाडा

Dhangar Reservation : धनगर समाजाच्या आरक्षण मागणीसाठी तरुणाने संपविले जीवन

धनगर समाजाला अनुसूचीत जमातीचे आरक्षण सरकार देत नसल्यामुळे मी खचून गेलो असल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे.

प्रशांत शेटे

चाकूर - धनगर समाजाला अनुसूचीत जमातीचे आरक्षण सरकार देत नसल्यामुळे मी खचून गेलो असल्यामुळे मी आत्महत्या करीत आहे माझे लेकरं सरकारच्या स्वाधीन करीत आहे अशी चिठ्ठी लिहून आष्टा (ता. चाकूर) येथील ३२ वर्षाच्या तरूणांने रेल्वेखाली उडी घेवून आत्महत्या केली आहे.

आष्टा येथील रमेश चंद्रकांत फुले (वय ३२) हा तरुण धनगर समाजाला अनुसुचित जातीचे आरक्षण मिळावे यासाठी होत असलेल्या आंदोलनात सहभागी झाला होता. सरकार धनगर समाजाला आरक्षण देत नसल्यामुळे मी खचून गेलो असून मी आत्महत्या करीत आहे माझे लेकरं सरकारच्या स्वाधीन करीत आहे अशी चिठ्ठी त्याच्याजवळ सापडली असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

रमेश यांने रविवारी (ता.२४) मध्यरात्री नांदेड ते पनवेल जाणाऱ्या रेल्वेच्या खाली आष्टा ते नांदगाव दरम्यानच्या रूळपटरीवर आत्महत्या केली आहे. पोलीस कर्मचारी भागवत मामडगे यांनी सोमवारी (ता.२५) सकाळी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. मयत रमेश यांच्या पश्चात्य पत्नी, दोन मुली, एक मुलगा, भाऊ, आई, वडील असा परिवार आहे.

नळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात श्वविच्छेदन करण्यात आले आहे. याबाबत धनगर समाज विकास परिषदेने मृत तरूणाच्या कुटुंबीयाला सरकारने दहा लाख रूपयाची मदत द्यावी, कुंटुबातील एका व्यक्तीना शासकीय नोकरी द्यावी, शासकीय योजनेचा लाभ देण्यात यावा, धनगर समाजाला तातडीने एसटीचे आरक्षण द्यावे आदी मागणीचे निवेदन तहसीलदारांना दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT