Young man kidnapped and brutally assaulted in Gevrai Sakal
मराठवाडा

Beed: गेवराईतील वाॅशिग सेंटरवर काम करणा-या युवकाचे अपहरण करुन प्राणघातक हल्ला !

Beed: गेवराई शहरात एका वाॅशिग सेंटरवर काम करणा-या विस वर्षीय युवकाचे अपहरण करून जबर मारहाण केल्याचा प्रकार..

सकाळ वृत्तसेवा

जातेगाव: गेवराई शहरात एका वाॅशिग सेंटरवर काम करणा-या विस वर्षीय युवकाचे अपहरण करून जबर मारहाण केल्याचा प्रकार ता ३० सप्टेंबर रोजी वडीगोद्री परिसरात घडला असून सदरील तरुणावर बीडमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

किशोर दिपक शिंदे(वय २०)रा.गेवराई जि.बीड असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे.गेवराई शहरातील पांढरवाडी रस्त्यावरील एका वाॅशिग सेंटरवर तो काम करत आहे.नेहमीप्रमाणे ता ३० सप्टेंबर रोजी किशोर शिंदे हा कामावर गेला होता.वडीगोद्री(ता अंबड)येथील त्याच्या ओळखीचे पाच जण किशोर काम करत असलेल्या वाॅशिग सेंटरवर येऊन चोरी करण्यासाठी आमच्याबरोबर चल असे म्हणत असताना, सदरील युवकाने यासाठी विरोध केला.तरीही त्यास बळजबरीने चारचाकी गाडीत घेऊन काही अंतरावर गेले.सोबत आणलेले मद्य(दारू) पाजून किशोर शिंदे यास मारहाण करु लागले.एवढेच नाहीतर त्याच्या पायावर चाकू मारुन त्यास सोनपेठ(जि.परभणी) परिसरात दिल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला.

किशोर हा गंभीर जखमी असल्याची माहीती त्याच्या कुटुंबाला मिळताच काल त्यास सोनपेठहून आणले.सध्या त्याच्यावर बीड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहीती कुटुंबीयांनी दिली असून आद्याप तरी गुन्हा दाखल झाल्या नसल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Varanasi Train: पुणेकरांचे काशीदर्शन झाले सोपे! आता हडपसर वरून थेट वाराणसीला 'अमृत भारत' ट्रेन, PM मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

Heart Health: वन बॉडी वन हार्ट : जीवनशैली, ताण, चयापचय आरोग्य आणि लवकर तपासणी एकत्रितपणे तुमचा हृदयाचा धोका कसा ठरवतात?

Latest Marathi News Live Update: कोल्हापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला कोर्टात केलं हजर

दहशतवादी संघटनेशी तुमचं कनेक्शन सापडंलय...NIA च्या नावाने डिजिटल अरेस्ट; वृद्धाची 9.5 लाखांची फसवणूक, कसं सुरक्षित राहायचं पाहा

Gold Rate Today: सोनं स्वस्त झालं की महागलं? दोन दिवसांतच भावात मोठा बदल; आजचा ताजा दर पाहा

SCROLL FOR NEXT