Sambhaji Nagar  sakal
मराठवाडा

Sambhaji Nagar : टवाळखोरानी काढली युवतीची छेड ; पोलिस ठाण्यात जमाव,साताऱ्यात सिनेस्टाईल घटना

साताऱ्यात काही टवाळखोरानी शनिवारी (ता.२४) रात्री सिनेस्टाईल एका तरुणीची छेड काढली. यामुळे मोठा जमाव सातारा पोलिस ठाण्यात जमला होता. या घटनेत स्थानिक राजकीय नेत्याच्या मुलाचाही समावेश असल्याने घटनेला राजकीय वळण मिळाले.

सकाळ वृत्तसेवा

छ्त्रपती संभाजीनगर : साताऱ्यात काही टवाळखोरानी शनिवारी (ता.२४) रात्री सिनेस्टाईल एका तरुणीची छेड काढली. यामुळे मोठा जमाव सातारा पोलिस ठाण्यात जमला होता. या घटनेत स्थानिक राजकीय नेत्याच्या मुलाचाही समावेश असल्याने घटनेला राजकीय वळण मिळाले. सातारा येथे एमआयटी कॉलेज परिसरात एक २२ ते २४ वर्षाची तरुणी शतपावली करीत होती.

अकरा वाजेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या काही टवाळखोरानी तिची छेड काढली. तिने विरोध दर्शविताच टवाळखोर आणखी आक्रमक झाले. यानंतर झालेल्या झटापटीत तिचे कपडे फाटल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. हा आवाज ऐकूण स्थानिकांनी धाव घेतली. हे पाहून टवाळखोर पळाले.

तो पर्यंत स्थानिकांनी दुचाकीचा क्रमांक आणि त्यातील काही जणांना ओळखले. यात एका बांधकाम व्यावसायिक तथा स्थानिक राजकीय नेत्याच्या मुलाचा सामावेश होता. या राजकीय नेत्याची बायको देखील माजी सरपंच होती. यामुळे स्थानिकांनी एकजूट होत थेट सातारा पोलिस ठाणे गाठले.

ठाण्यात जमाव जमत गेला गांभीर्य ओळखून सहायक पोलिस आयुक्त रणजित पाटील, ब्रह्मा गिरी यांनी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान शेवटचे वृत्त हाती येई पर्यंत पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banking Evidence Law: भारतात १३५ वर्षांनंतर कायद्यात मोठा बदल! आता स्क्रीनशॉटही कोर्टात वैध पुरावा ठरणार; नवा बँकिंग पुरावा कायदा काय आहे?

IND vs SL 1st Test: भारताचा सराव सामना उद्यापासून! Live कुठे पाहता येणार, किती वाजता मॅच सुरू होणार? श्रीलंकेला बसलाय मोठा धक्का

UPI Payment Charges: 2,000 रुपयांपेक्षा जास्त रकमेचे UPI पेमेंट केल्यास चार्ज लागणार? RBI गव्हर्नरांची मोठी माहिती

अरे सुरेखा परत आली रे! जे दिग्याला नाही जमलं ते मामाने केलं, पुन्हा एकदा अंकुश चौधरीसोबत दिसली रिचा, अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

Marathi News Live Updates : सर्व दोष केंद्र सरकारवर ढकलणे योग्य नाही - रामदास आठवले

SCROLL FOR NEXT