मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या Sakal
मराठवाडा

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या; जिंतूर तालुक्यातील संक्राळा येथील घटना

मराठा समाज बांधवांना विनंती की आत्महत्तेसारखे टोकाचे निर्णय घेऊ नये

राजाभाऊ नगरकर.

जिंतूर : शेती अत्यल्प, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय सतत तोट्यात येत आहे त्यात आरक्षण नसल्याने मुलामुलींचे शिक्षण, लग्न कर्तव्यांसह अनेक आर्थिक संकटांना सामोरे जाताना त्रस्त झालेल्या मराठा समाजातील तरुण शेतकऱ्याने शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना जिंतूर तालुक्यात बामणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत संक्राळा या खेड्यात सोमवारी (ता.०६) उघडकीस आली.

नातेवाईकांच्या माहितीवरून सायंकाळच्या सुमारास पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली. ज्ञानेश्वर नानासाहेब पवार असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. सूत्रांच्या माहितीनुसार ज्ञानेश्वर पवार यांना अत्यल्प शेती असून त्यांच्यावरच कुटुंबाच्या पालनपोषणाचा भार होता.

यावर्षी पाऊसही कमी झाल्यामुळे शेती उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट झाली.शिवाय मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या पवार यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

घटनेची माहिती नातेवाईकांना मिळताच त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. बामणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा घायवट सहकारी पोलीस कर्मचाऱ्यासह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यानंतर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली.

सदरील घटनेवरून मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार मराठा समाजाला आरक्षण किती गरजेचे आहे हे दिसून येते परंतु सरकार वेळकाढू पणा करत असल्यामुळे मराठा समाजात आत्महत्यांच्या घटना वाढत आहेत. मराठा समाज बांधवांना विनंती की आत्महत्तेसारखे टोकाचे निर्णय घेऊ नये, आईवडिल यांच्या संघर्षाचा विचार करा.मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे यात समाजाला यश मिळेल. निश्चीतच वेळ कठीण आहे परंतु ती निघुन जाईल तेंव्हा संयम बाळगावा.

- बालाजी शिंदे,सोसकर विभागीय अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, जिंतूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT