Youth commits suicide for Maratha reservation Madaj incident in Dharashiv villagers aggressive politics sakal
मराठवाडा

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

धाराशिव जिल्ह्यातील माडज येथील घटना, ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा

सकाळ वृत्तसेवा

उमरगा/माडज (जि. धाराशिव) : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेले आमरण उपोषण संपत नसताना धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील माडज येथील एका मराठा तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास गावातील शिवकालीन वैजनाथ महाराज तलावात उडी घेऊन आत्महत्या केली.

किसन माने याने मराठा आरक्षणासाठीच आत्महत्या केल्याचा दावा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने लोकांचा जमाव वाढला होता. परिणामी, रात्री उशिरापर्यंत गावात शांतता होती.

घटनेची माहिती समजताच गावातील लोक तलावाभोवती जमले. प्रत्यक्षदर्शनी व्यंकट गाडे यांनी सांगितले की, किसन हा नेहमी मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करायचा. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास त्याने कपडे काढत मराठा आरक्षण मिळाले पाहिजे, असे म्हणत तलावात उडी घेतली. तेव्हा मी तलावात उडी घेऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला.

परंतु, तो गाळात अडकल्याने आम्ही वाचवू शकलो नाही. यानंतर तहसीलदार, पोलिस निरीक्षक आदी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, गावात मराठा आरक्षणासाठी तरुणांची जोरदार घोषणाबाजी सुरू होती.

टायर जाळून निषेध

याचे पडसाद उमरगा शहरात उमटले असून, शहरातील मुख्य मार्गावरील अशोक चौकात रात्री आठच्या सुमारास संतप्त जमावाने घोषणाबाजी देत रास्ता रोको आंदोलन करत रस्त्यावर टायर पेटवून दिले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.

तहसील कार्यालयासमोर आज आंदोलन

किसनच्या आत्महत्येमुळे माडज ग्रामस्थ संतापले आहेत. त्याचा मृतदेह जागेवरून हलविणार नाही, गुरुवारी (ता. ७) उमरग्यातील उपविभागीय कार्यालयासमोर मृतदेह ठेवण्यात येणार असून, जिल्हाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात लेखी दिल्याशिवाय किसनच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचा ग्रामस्थांनी पावित्रा घेतला होता. परंतु मृतदेहाची अवहेलना होऊ नये, यासाठी शवविच्छेदन झाल्यानंतर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करून किसनला सार्वजनिक श्रद्धांजली अर्पण करून अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना बंद होणार? 'या' बड्या नेत्याच्या दाव्याने महिलांमध्ये खळबळ

तुझे न्यूड फोटो पाठवशील का? अक्षय कुमारच्या १२ वर्षाच्या मुलीला आला घाणेरडा मेसेज; अभिनेत्याने सांगितलं नेमकं काय घडलं

Cough Syrup Deaths : 'कफ सिरप'ने घेतला 12 बालकांचा जीव, पाच मुले गंभीर; औषधात आढळला विषारी घटक, नागपूर प्रयोगशाळेत झाली महत्त्वाची चाचणी

Mumbai Political News : नवी मुंबईत भाजपचाच महापौर, कार्यकर्त्यांचा मान राखला जात नसेल तर युती होऊ नये : गणेश नाईक

ICC Women's World Cup : पाकिस्तानच्या पराभवाने टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली! आता एक चूक हरमनप्रीत कौरच्या संघाला पडू शकते महागात

SCROLL FOR NEXT